शिरुर प्रतिनिधी:
श्री. छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेच्या सिताबाई थिटे कॉलेज ऑफ डी. फार्मसी आणि बापूसाहेब थिटे कॉलेज ऑफ नर्सिंग महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परिमल अँड प्रमोद चौधरी फाउंडेशन (PPCF) आणि ओपाश सोसिओ. कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने फेलोशीप देण्यात आली.
या कार्यक्रमासाठी पी.पी.सी.एफ. मार्फत उपस्थित असलेल्या सौ. सुजाता गोहड आणि बाबू भंडारे या मान्यवरांचे सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शहा यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान सौ. सुजाता मॅडम यांनी विद्यार्थ्यांना फेलोशीप देण्यामागील मुख्य उद्दिष्ट्ये आणि त्याबाबतची प्रक्रिया सविस्तरपणे सांगितली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शहा सरांनी सुद्धा फेलोशीपचे महत्व तसेच या विद्यार्थ्यांनी भविष्यामध्ये इतर गरीब कुटुंबातील गुणवंत मुले शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आर्थिक मदत करावी आणि समाजासमोर एक आदर्श व्यक्ती बनावे असे आवाहन विद्यार्थ्यांना केले.
तसेच काही विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
डी. फार्मसीचे कु. कृतिका गलांडे, कु. तुषार धाडगे, कु. श्रद्धा इचके, कु. बहिरट अमृता तसेच जी. एन. एम. नर्सिंगच्या कु. पायल गाडे, कु. कावेरी अरेकर, कु. सानिका दरेकर, कु. शिवानी झालटे अशा ८ विद्यार्थ्यांना एकूण रक्कम ५,०६,०५८ फेलोशीप स्वरूपात प्राप्त झाली. या कार्यक्रमासाठी पी.पी.सी.एफ. च्या सौ. सुजाता गोहड आणि बाबू भंडारे, डि. फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमोल शहा आणि नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. शीतल बर्डे, प्रो. मानसी गरदरे, पालक आणि विद्यार्थीही उपस्थित होते.
संस्थेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्रजी थिटे, सचिव धनंजय थिटे, डॉ. हर्षवर्धन थिटे आणि डी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. अमोल शहा यांनी फेलोशिप दिल्याबद्दल पी. पी. सी. एफचे आभार मानले व फेलोशिप प्राप्त विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
