संजय ऐलवाड यांना वीरेन गवाडिया आदर्श पत्रकार पुरस्कार -दि पूना मर्चेंट्स चेंबरचे आदर्श व्यापारी उत्तम पुरस्कार जाहीर

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे प्रतिनिधी :सागर पवार
पुना मर्चंटस चेंबरच्या वतीने आदर्श व्यापारी उत्तम पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. वस्तीमल संकलेचा, विजयकुमार भन्साळी, आनंद पटेल, सतीश गुप्ता, राजीव बाठिया यांना यंदाचे पुरस्कार जाहीर झाले आहेत.

तसेच कै. वीरेन गवाडिया यांच्या स्मृतीनिमित्त दिला जाणारा आदर्श पत्रकार पुरस्कार केसरीचे बातमीदार संजय ऐलवाड यांना जाहीर झाला आहे.
दर वर्षी महर्षी उत्तमचंद उर्फ बाबा पोकर्णा यांच्या स्मृतीदिनानिमित्त दि पुना मर्चंटस् चेंबरतर्फे आदर्श व्यापारी पुरस्कार दिले जातात. यंदा राज्यस्तरीय पुरस्कारासाठी सोलापूर येथील मे. गौतम ट्रेडर्सचे संचालक वस्तीमल तखतमल संकलेचा, जिल्हास्तरीय पुरस्कार राजगुरुनगरचे मे. संगम कलेक्शनचे संचालक विजयकुमार मोतीलाल भन्साळी, तर पुणे शहरासाठी मे. रामकृष्ण ऑईल मिलचे संचालक आनंद श्रवणकुमार पटेल यांची निवड करण्यात आली आहे.
दि पूना मर्चेंट्स चेंबरच्या सभासदांमधून दिला जाणारा पुरस्कार मे. पुरणचंद अ‍ॅन्ड सन्स संचालक सतीश गुप्ता, तर युवा व्यापारी पुरस्कार मे. आर. बीज ड्रायफ्रूट्सचे संचालक राजीव बाठिया यांना जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्काराचे हे तिसावे वर्ष आहे. मानपत्र व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्काराचे वितरण सोहळा 20 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता जयराज स्पोर्ट्स अँड कन्वेन्शन सेंटर, क्रोम बॅक्वेट कोंढवा, येथे होणार आहे. सुरतचे राज्यसभा खासदार गोविंद ढोलकिया यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जैन अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी आणि उद्योजक प्रकाश धोका उपस्थित राहणार असल्याची माहिती चेंबरचे अध्यक्ष रायकुमार नहार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सचिव ईश्वर नहार, सहसचिव आशिष दुगड, माजी अध्यक्ष राजेंद्र बाठिया, प्रविण चोरबेले, नवीन गोयल, दिनेश मेहता, उत्तम बाठिया, संदीप शहा तसेच कार्यकारी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 7 8 4 1
Users Today : 23
Users Yesterday : 115