शिरुर प्रतिनिधी
पाचशे वर्षाच्या लढ्यानंतर अयोध्येत भव्य आणि दिव्य प्रभू श्रीराम मंदिर साकारले गेले.या लढ्यात
आपल्या प्राणांची आहुती देणारे बजरंग दलाचे वीर बजरंगी राम कोठारी व शरद कोठारी यांच्या स्मरणार्थ पूर्ण देशभर महा रक्तदान शिबिराचे आयोजन ,विश्व हिंदू परिषद बजरंग करत असते.
सलग दिवस ,दरवर्षी संपुर्ण भारत भर रक्तदान करण्यात येते , याआगळ्या वेगळ्या
बजरंग दलाच्या रक्तदानाची नोंद ग्रीनीच बुक ने देखील घेतली आहे .
शिरूर मध्ये देखील प्रभू श्रीराम मंदिर येथे कोठारी बंधू यांच्या स्मरणार्थ रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते .
या रक्तदानात 161 श्रीराम भक्तांनी ( रक्तदात्यांनी ) रक्तदान करत आपला सहभाग नोंदवला.
शिरूर मध्ये अनेक वर्ष दुर्लक्षित असलेले व अतिशय पुरातन प्रभू श्री राम मंदिर लवकरात लवकर भव्य दिव्य स्वरूपात उभे राहावे अशी ईच्छाा,भावना,सर्व रक्तदात्यांनी यावेळी व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व रक्तदात्यांचे आभार बजरंग दलाचे जिल्हा सहसंयोजक अजिंक्य तारु यांनी व्यक्त करत ,सर्व रक्तदात्यांना बजरंग दलाने आयोध्येतील प्रभु श्री राम मंदीरासाठी लढा दिला तसाच ,शिरुर मधील राम मंदिराचा जिर्णोद्धार देखिल बजरंग दल लवकरात लवकर करणार असा विश्वास यावेळी बजरंग दलाकडून देण्यात आला .
यावेळी अजिंक्य तारू
(बजरंग दल जिल्हा सहसंयोजक)
गणेश राक्षे, सुनील इंदुलकर, संजय आडलिंग, सागर परभाने, प्रतीक शर्मा, रोहन जामदार, आशिष उबाळे, यश शर्मा, ऋषिकेश गुजर, धीरज शर्मा, आकाश चाकणे,रेवन जगदाळे, शिवम खैरनार,,तेजस निचित ,ओमकार अष्टेकर प्रसाद वाळुंज ,रोहित कुसळे ,सोन्या साठे,अमोल लुनिया,विजय नर्के,शेखर भंडारी,तेजस नेटके, नितीन पाचर्णे,रवीबाप्पु काळे,तुषार बधाने,केशव लोखंडे इत्यादी उपस्थित होते.
