एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत [शिरूर तालुका शिवसेना पदाधिकाऱ्यांचे महादेवाला साकडे ]

Facebook
Twitter
WhatsApp

कोरेगाव भीमा : प्रतिनिधी विनायक साबळे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून ,शिरूर तालुका शिवसेनेच्या वतीने,शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील नरेश्वर मंदिरात शंकर महादेवाला साकडे घालण्यात आले.

विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेसह भाजप, राष्ट्रवादी महायुतीला भरभरून यश मिळाले. त्यात लाडकी बहीण योजना, लखपती दीदी योजना, बचत गटांसाठी 30 हजार रुपये अनुदान, महिलांठी 50 टक्के एसटी भाडे, मुलींना मोफत शिक्षण, शेतकरी वीजबिल माफी यासारख्या अनेक योजना राबवण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांचा सिंहाचा वाटा आहे.
हे महायुतीचे सरकार लोकहिताचे असून याचाच एक भाग म्हणून एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शिरूर तालुक्यातील शिवसेनेच्या लाडक्या बहिणींनी शंकराच्या मंदिरामध्ये आरती करत साकडे घातले.

यावेळी शिरूर तालुका महिला आघाडीची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये अश्विनी उमेश जाधव यांची पुणे जिल्हाच्या उपसंघटिका पदी नियुक्ती करण्यात आली. यासह शिरूर तालुका प्रमुखपदी सीमा योगेश पवार, तालुका संघटक सुमन साळवे,
उपतालुकाप्रमुख अश्विनी लांडगे (निमगाव महाळुंगी),
तालुका समन्वयक कोमल पवार,मुख्यमंत्री मदत कक्ष तालुका अध्यक्ष शिवकन्या लांडगे, कामगार सेना शिरूर तालुकाअध्यक्ष मंगल झेंडे, बचत गट तालुकाध्यक्ष सुवर्णा दिघे, शिक्रापूर – सणसवाडी जिल्हा परिषद गट प्रमुख अनिता सासवडे, तळेगाव – रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गट प्रमुख अलका घोलप, शिक्रापूर – कासरी पंचायत समिती गट उपविभाग प्रमुख आश्विनी साकोरे, सणसवाडी कोरेगाव – भीमा पंचायत समिती गट उपविभाग प्रमुख ज्योती जुवार, रांजणगाव सांडस पंचायत समिती गट उपविभाग प्रमुख रूपाली गोरडे, तळेगाव – रांजणगाव सांडस गटप्रमुख कोमल रणदिवे, शिरूर ग्रामीण नाव्ह रा जिल्हा परिषद गट उपतालुकाप्रमुख आशा वाळके, तळेगाव रांजणगाव जिल्हा परिषद गट प्रमुख पुनम चव्हाण, शिक्रापूर शहर प्रमुख राधाबाई शिंदे, शिक्रापूर उपशहर प्रमुख सुरेखा दराडे यादींची यावेळी नियुक्ती करण्यात आल्या.
नियुक्तीचे पत्र पुणे जिल्ह्याच्या संपर्कप्रमुख अॅड. गीतांजली ढोणे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख अनिल काशीद, जिल्हा समन्वयक अण्णा हजारे, तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, शाखाप्रमुख भाऊसाहेब हरगुडे, रामदास हरगुडे, अतुल सासवडे, नवनाथ लांडगे सामाजिक कार्यकर्ते रावसाहेब दिघे तसेच मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या महिला पदाधिकारी उपस्थितीत होत्या.

यावेळी नवनिर्वाचित तालुकाप्रमुख सीमा पवार म्हणाल्या की, आदरणीय एकनाथजी शिंदे व वरिष्ठ सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे विचार ध्येय धोरण तसेच सर्व शासकीय योजना तळागाळापर्यंत गोरगरीब गरजूंपर्यंत आम्ही पोहोचवणार आहोत,तसेच शिरूर तालुक्यामध्ये ,शिवसेना संघटन अधिक बळकट करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 2 1 4 2
Users Today : 80
Users Yesterday : 503