Breaking News
‘सृजनशील पालकत्व’ मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न – गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, जीवनमूल्यांचे अनोखे संस्कार दोन महिलांना मिळाले हरवलेले दागिने; शिरूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी पोलीस निरीक्षक संदेश यांच्यावर होतोय सर्व स्तरातून होतोय अभिनंदनचा वर्षाव! डॉ. पवन सोनवणे यांच्या राजकारणाच्या एंट्रीने वाघोलीत राजकीय गणिते बदलणार. दक्षिण कोरियात होणाऱ्या 11 व्या सोल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ब्लॉसमिंग आॉलमंड या चित्रपटाची निवड करण्यात आली. शिरूर शहरातून मोटारसायकल चोरी करणारा सराईत चोरटा परजिल्ह्यातून जेरबंद शिरूर पोलिस तपास पथकाची यशस्वी कारवाई मनोवैज्ञानिक दृष्टीकोनातून लिहिलेल्या बाल कविता…

पुरस्कार म्हणजे जबाबदारी मध्ये वाढ – शिक्षक आमदार प्रा.जयंत आसगांवकर

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी

शिरूर तालुक्यातील शिक्षक म्हणजे उपक्रम व शैक्षणिक गुणवत्तेचे प्रमुख केंद्र आहे .  यामुळे रोटरी क्लबचा राष्ट्र निर्माता शिक्षक पुरस्कार प्राप्त करणे ,म्हणजे जबाबदारी मध्ये वाढ असल्याचे प्रतिपादन पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केले.
शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांसाठी रोटरी क्लब ऑफ शिक्रापूर यांच्या वतीने सन 2024 साठीचे नेशन बिल्डर अवॉर्ड प्रदान करण्याच्या कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते .
शिरूर तालुक्यातील विविध शाळांमधून प्राथमिक व माध्यमिक विभागाचे एकूण 21 गुणवंत शिक्षक यासाठी निवडण्यात आल्याचे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ शिक्रापूरचे अध्यक्ष विठ्ठल वाघ व सचिव तुषार पाचुंदकर पाटील यांनी केले.
रांजणगाव गणपती येथे स्व.बाबुराव दौंडकर स्मारक समिती सभागृहामध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी पाठ्यपुस्तकातील कवी हनुमंत चांदगुडे,संस्थापक अध्यक्ष वीरधवल करंजे,असिस्टंट गव्हर्नर डॉ.मिलिंद भोसुरे,विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश बापु ढमढेरे,शिक्षक संघटनेचे राज्य प्रवक्ते दादासाहेब गवारे, मारुती कदम, तुकाराम बेनके, राजेंद्र ढमढेरे, गुलाबराव गवळे, रामनाथ इथापे, अनिल साकोरे, रामदास चव्हाण इ. मान्यवर उपस्थित होते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या शिक्षकांना प्रोत्साहन म्हणून हा सन्मान सोहळा आयोजित केला असल्याचे प्रतिपादन संयोजक मनोहर परदेशी,राहुल चातुर यांनी सांगितले.
याप्रसंगी महाराष्ट्र शासन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४ विजेते सचिन बेंडभर यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
पुरस्कार प्राप्त शिक्षक –
गुरुदत्त पाचर्णे,गणपत बोत्रे,यशवंत बेंद्रे,महादेव पाटील,श्याम नाईक,विशाल कुंभार,अलका सातपुते,मनीषा साळुंखे,रमेश करपे,देविदास कंठाळे,दीपक मोरे,
सुनंदा राहुलकर,सुरेखा डोईफोडे,विलास पुंडे,बाबासाहेब शेरकर,दत्तात्रय वाळेकर,गोरक काळे,दीपक सरोदे,पोपट भालेराव,गोरख कोथिंबीरे,वाल्मीक फाळके.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 2 1 9 3
Users Today : 131
Users Yesterday : 503