शिरूर प्रतिनिधी:
२५ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगामध्ये जागतिक फार्मसिस्ट दिवस म्हणून साजरा केला जातो .
यानिमित्ताने श्री छत्रपती संभाजी शिक्षण संस्थेच्या सिताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी (डी. फार्म व बी. फार्म) व केमिस्ट असोसिएशन ऑफ शिरूर तालुका यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक फार्मसी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी शिरूर शहरातील माजी कार्यकारणी सदस्य बाबाजी गलांडे, शिरूर तालुका केमिस्ट असोसिएशन सचिव सचिन गाडे, पुष्पराज कोळपकर, नवनाथ वाखारे, विजू ढमढेरे उमेश छाजेड, नितीन मामीडवार, मल्हारी वाळूंज, मनीष वाघ बालाजी पवार, अतुल शेवाळे संकेत घालमे, जयदत्त गायकवाड, चोथमल कोठारी इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
महाविद्यालयाच्या वतीने डी. फार्मसी चे प्राचार्य डॉ. अमोल शहा सर व बी फार्मसी चे प्राचार्य डॉ. द्वारकादास बाहेती सर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी बोलताना बाबाजी गलांडे यांनी फार्मासिस्ट हा डॉक्टर व रुग्ण यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा असून समाजाला निरोगी ठेवण्यासाठी ते आपले मोलाचे योगदान देत असतात हे नमूद केले.
सचिन गाडे यांनी मेडिकल व्यवसाय करत असताना येणाऱ्या अडचणींचा सामना कसा करावा याबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. अमोल शहा सर यांनी अँटिबायोटिक रेजिस्टन्स याविषयी मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले तर डॉ. बाहेती सर यांनी येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
महाविद्यालयाच्या वतीने जयदत्त गायकवाड यांना त्यांनी समाजाप्रती एकनिष्ठ राहून केलेल्या औषध विक्री व रुग्ण समुपदेशनाच्या माध्यमातून केलेल्या रुग्णसेवेबद्दल सीनियर फार्मासिस्ट अवॉर्ड देऊन गौरविण्यात आले. हा पुरस्कार दिल्याबद्दल त्यांनी महाविद्यालयाचे आभार मानले तसेच सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा ही दिल्या.
संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्रजी थिटे यांनी सर्व विद्यार्थ्यांना फार्मासिस्ट हा आरोग्य सेवेचा एक अविभाज्य घटक असून रुग्णसमपदेशन ही काळाची गरज असल्याचे नमूद केले.
यानंतर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमार्फत शिरूर शहरांमधून रॅली चे आयोजन करण्यात आले. यावेळी डी फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी अमली पदार्थांचा गैरवापर व त्यामुळे होणारे दुष्परिणाम या विषयावरती तर बी फार्मसी च्या विद्यार्थ्यांनी मोबाईल व नशा याचे दुष्परिणाम या विषयावर शिरूर बस स्थानक व पाच कंदील चौक या परिसरात पथनाट्य सादर करण्यात आले.
महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना केमिस्ट असोसिएशन ऑफ शिरूर तालुका यांच्या वतीने अल्पपहार देण्यात आला
