Breaking News
‘सृजनशील पालकत्व’ मार्गदर्शन मेळावा उत्साहात संपन्न – गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, जीवनमूल्यांचे अनोखे संस्कार दोन महिलांना मिळाले हरवलेले दागिने; शिरूर पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी पोलीस निरीक्षक संदेश यांच्यावर होतोय सर्व स्तरातून होतोय अभिनंदनचा वर्षाव! डॉ. पवन सोनवणे यांच्या राजकारणाच्या एंट्रीने वाघोलीत राजकीय गणिते बदलणार. दक्षिण कोरियात होणाऱ्या 11 व्या सोल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी ब्लॉसमिंग आॉलमंड या चित्रपटाची निवड करण्यात आली. शिरूर शहरातून मोटारसायकल चोरी करणारा सराईत चोरटा परजिल्ह्यातून जेरबंद शिरूर पोलिस तपास पथकाची यशस्वी कारवाई मनोवैज्ञानिक दृष्टीकोनातून लिहिलेल्या बाल कविता…

दिपाली नागवडे गोरगरीब जनतेसाठी झटणाऱ्या सरपंच

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी

ग्रामपंचायत बाभुळसर बू! येथील सरपंच दिपाली नागवडे यांनी जेव्हा पासून सरपंच झाल्या आहेत, तेंव्हा पासून अनेक समाज उपयोगी उपक्रम व सरकारी योजना लोकापर्यंत पोहचविण्ासाठी दिवस रात्र काम करत आहेत.
यात काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री वयोश्री योजने अंतर्गत 65 वर्ष पूर्ण व्यक्तीस एका वेळेस शासनामार्फत मिळणारे 3000 रुपये या योजनांचे भव्य असा कॅम्प त्यांनी सोमवार दि.३१ ऑगस्ट आणि २सप्टेंबर या दोन दिवशी भरविला .
विशेष म्हणजे त्यांनी स्वतः जातीने लक्ष घालून गावातील नागरिकां चे फॉर्म भरून घेतले. काही ग्रामपंचायत मधील नागरिकांना हि योजना माहीत नाही.
अशात बाभुळसर ग्रामस्थांचा आनंद चेहऱ्यावर दिसून येत होता .
यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये मा.सरपंच गणेश मचाले, सरकारी डॉक्टर फाटले,कविता पाटोळे ग्रामपंचायत सदस्या, मा.उपसरपंच सुनील देशवंत, संत तुकाराम सोसायटी संचालक रामदास नेते नागवडे,रामराव पाटील,महेंद्र नागवडे युवा नेते राष्ट्रवादी,सुभाष नाना नागवडे,हरिभाऊ नागवडे श्री.दत्त पतसंस्था चेअरमन,सोमनाथ नागवडे, बाळासो शंकर नागवडे, बाभुळसर विकास सोसायटी संचालक मच्छिंद्र राऊत,नामदेव कुंडलिक नागवडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.यावेळी मांडवगण फराटा सरकारी डॉक्टर सांगळे,गावातील आशासेविका रुक्साना अल्वी,राधिका रणदिवे, कुदळे मॅडम यांनी यांच्या समवेत सरपंच दिपाली महेंद्र नागवडे यांनी सर्वांचे फॉर्म भरून घेतले.
या कार्यक्रमावेळी बोलताना सरपंच नागवडे यांनी सांगितले की महायुतीचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार असून प्रत्येक व्यक्तीला काहीना काही लाभ दिला जात आहे .

यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, साठ वर्षांपुढील वयोश्री योजना, मुलींना मोफत शिक्षण, महिलांना बस मध्ये 50% तिकिटामध्ये सूट असे अनेक लाभ या महायुतीच्या शासनाने दिलेले आहेत. बाभुळसर ग्रामपंचायत मध्ये शासनाच्या योजनेचे सर्व प्रकारचे कॅम्प भरून गावातील प्रत्येक व्यक्तीला सर्व योजनेचा लाभ देण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला जात आहे.
तर यावेळी सर्वांचे विशेष आभार महेंद्र नागवडे यांनी मानले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 2 2 0 2
Users Today : 140
Users Yesterday : 503