कारेगाव प्रतिनिधी: अमोल कोहकडे
शिरूर येथील वेदपाठक कॉम्प्युटर इन्स्टिट्युट मध्ये संस्थेच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त विद्यार्थ्यांना अगदी सवलतीच्या दरामध्ये म्हणजेच फक्त,1800 रू मध्ये कॉम्प्युटर कोर्स करता येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय वेदपाठक ह्यांनी सांगितले .
वेदपाठक कॉम्प्युटर इन्स्टिट्युट ही शिरूर तालुक्यातील कॉम्प्युटर प्रशिक्षण देणारी अग्रगण्य संस्था असून दरवर्षी शेकडो विद्यार्थी ह्या ठिकाणी विविध कोर्स करत असून ह्या संस्थेच्या माध्यमातून गरजू बेरोजगार युवा पिढीला रोजगार मिळवून दिला जातो.
गेल्या 20 वर्षात अनेक विद्यार्थ्यांनी MSCIT, Tally, Hardware Networking , DTP ह्या कोर्सच्या माध्यमातून नोकरी तर काहींनी स्वतःचे व्यवसाय उभे केले आहे ,असे वेदपाठक यानी सांगितले .
2024 हे संस्थेचे 20 वे वर्ष आहे म्हणून, विविध कोर्सेस वर संस्थेच्या वतीने ऑफर दिल्या आहेत व मुलांना प्रगतीच्या दिशेने वाटचाल करण्या साठी एक प्रकारची मदत केली जात आहे. कारण अताचे युग हे “संगणक” युग आहे.
काही निवडक कोर्स जसे की MS OFFICE EXPET , Tally , Excel ,Data entry , Marathi/ english Typing ह्या कोर्सवर ही ऑफर असून विद्यार्थ्यांनी ह्याचा लाभ घ्यावा असे आवाहन वेदपाठक यांनी केले आहे .
तसेच ही ऑफर सरदवाडी येथील यश कॉम्प्युटर इन्स्टिट्युट येथे उपलब्ध आहे .
