स्वराज्य रक्षक फाउंडेशन व यशस्विनी फाउंडेशनचे काम प्रेरणादायी: शांताराम कटके

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
स्वराज्य रक्षक फाउंडेशन व यशस्विनी वेल्फेअर फाउंडेशन यांच्या वतीने शिरूर तालुक्यात प्रथमच, महिला दहीहंडी स्पर्धा मागील वर्षा पासून घेण्यात येत आहेत.
या वर्षी ८ सप्टेंबर २०२४ रोजी रयत शाळेच्या मैदानावर या महिला दही हंडी चे आयोजिन करण्यात आले होते.
यावेळी सीताबाई थिटे कॉलेज ऑफ फार्मसी च्या मुलींनी दहीहंडी फोडून प्रथम क्रमांक मिळवला व प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विजेता संघास माजी नगराध्यक्ष रवी उर्फ श्याम मनोहर ढोबळे यांच्या वतीने प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले.
तसेच यावेळी शासन नियुक्त विकास समिती पुणे महानगरपालिका तथा उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे शांताराम (बापू )कटके व महिला दक्षता कमिटी लोणीकंद पोलीस स्टेशनच्या अर्चना शांताराम कटके यांची विशेष उपस्थिती लाभली होती.
या महिला दही हंडी कार्यक्रमास रवि बापू काळे , संदिप आव्हाळे तसेच अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
या महिला दही हंडी कार्यक्रमास विशेष उपस्थित म्हणुन लाभलेले शांताराम (बापू) कटके यांनी, आपले मनोगत व्यक्त करताना, महिलांनी असे कार्यक्रम घेऊन समाजात एक आदर्श निर्माण केला आहे व विशेष म्हणजे ही दही हंडी फक्त शिरूर तालुक्यातील शाळा व कॉलेज यांच्या प्रोसोनासाठी घेण्यात येत आहे व समाजातील अशाच भगिनी पुढे आल्या तर समाजात नक्कीच प्रगती होईल.
यावेळी कला क्रीडा, सामाजिक व राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व पत्रकार बांधव तसेच, अर्चनाताई कटके, प्राजक्ता ढोबळे, पूजा कंद, शोभना पाचंगे, राणी कर्डिले, आशा पाचांगे, पठाण भाभी, साधना शितोळे, किरण झांबरे, स्वाती थोरात, काजल थोरात, सुनीता डोंगरे, सुरेखा बोस, मनीषा वाळुंज , याच बरोबर अनेक महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
तर या कार्यक्रमास अमृत झांबरे, विक्रम ठाकुर, संजय थोरात, रवि लेंडे, चैतन्य ताकिर, प्रथमेश पोळ, संदेश गवारे यांनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सहकार्य केले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 7 8 4 1
Users Today : 23
Users Yesterday : 115