Breaking News
शिरूरमध्ये अवैध दारूविक्रीविरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक…. पोलीस निरीक्षकांना निवेदन; कठोर कारवाईची मागणी. मांडवगण फराटा येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी भक्तिरसाची बरसात छोटे माऊली महाराज कदम यांच्या सुश्राव्य कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध मांडवगण फराटा येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शस्त्रपूजन व पथसंचलन मोठ्या दिमाखात शिस्त, एकजूट आणि राष्ट्रभक्तीचा उत्साहपूर्ण आविष्कार गौरी शुगर अँड डिस्टीलरिज प्रा. लिमिटेड चा बाॅयलर अग्निप्रदिपन गळीत हंगाम ,मोफत साखर वाटप शुभारंभ संपन्न मांडवगण फराटा येथे शिरूर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांचा जनसंवाद दौरा आयोजन उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांच्याविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर; पदावरून हटविण्याचा निर्णय

गोलेगाव रोड शिरूर येथील मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या प्रवेश प्रक्रियेस सुरुवात…

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी :—

शिरूर तालुक्यातील गोलेगाव रोड, शिरूर येथील मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह येथे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षाकरीता प्रवेश प्रक्रियेस सुरुवात झाली असून इच्छुकांकडून प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत.

 

या वसतिगृहात बाहेरगावाकडील परंतु शिरूर परिसरात शिक्षण घेणाऱ्या गरीब होतकरू अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासवर्ग, विशेष मागासप्रवर्ग, अनाथ, दिव्यांग असलेल्या विद्यार्थींनींना प्रवेश देण्यात येणार असून त्यांना विनामूल्य निवास व भोजन, पुस्तके, स्टेशनरी व शैक्षणिक बाबींकरीता आर्थिक सहाय्य आदी सुविधा पुरविण्यात येतील.

 

अर्जासोबत गुणपत्रिका, पालकांचा उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, विद्यार्थ्याच्या व त्याच्या वडिलांच्या आधार कार्डची प्रत, रहिवाशी दाखला, रेशन कार्डची छायांकित प्रत, बोनाफाईड प्रमाणपत्र आदी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे.

 

इच्छुक विद्यार्थींनी व पालकांनी मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह, गोलेगाव रोड, शिरूर ता. शिरूर येथे संपर्क साधून प्रवेश अर्ज घेऊन परिपूर्ण भरून द्यावेत, असे आवाहन वसतिगृहाच्या गृहपाल श्रीमती ए.आर.रणदिवे यांनी केले आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 9 6 9 6 8
Users Today : 24
Users Yesterday : 30