दिनांक 4 मे 2024 रोजी सांगली येथे लोकसभा भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार
संजय (काका) पाटील यांच्या प्रचारार्थ रामोशी बेडर बेरड समाजाच्या वतीने,मिरज तालुक्यात कोपरा सभेचे आयोजन, नरवाड तालुका मिरज येथे करण्यात आले होते.
यावेळी जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलतनाना शितोळे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा आयोजित करण्यात आली होती.
यावेळी दौलतनाना शितोळे म्हणाले की, भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील रामोशी, बेरड, बेडर समाजाच्या प्रमुख मागण्या मान्य झाल्या आहेत, आपल्या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्याकरता भारतीय जनता पार्टी व देवेंद्रजी फडणवीस हे प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत.तरी देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सांगली लोकसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय (काका) पाटील यांना, रामोशी, बेरड, बेडर समाजाच्या दिड लाख मतांनी निवडून द्यावे असे आवाहन त्यांनी उपस्थित असणाऱ्याना केले.
यावेळी उपस्थिता मध्ये नरवाड गावचे लोकनियुक्त सरपंच मारुती भाऊ जमादार, सुधीरजी दादा नाईक, राजेंद्र भाऊ जमादार, बाबु भाई जमादार, अजित भाऊ जमादार , रोहित भाऊ जमादार , ऋषी भाऊ जमादार यांच्यासह रामोशी, बेरड, बेडर समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Users Today : 12
Users Yesterday : 9