जिभीचे चोचले पुरवणारे आपले  हॉटेल ” कंदुरी मटण  “

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी  :—

 

शून्यातून विश्व एकीशिवाय नाही शक्य या म्हणीचा पुरेपूर वापर होताना दिसत आहे तो हॉटेल” कंदुरी मटण” या ठिकाणी.नगर पुणे रोड वर प्रथमच पाचरणे बंधूंनी एकत्र येत एक आगळे वेगळे, चिकूच्या वनराईत, घरगुती पद्धतीने मटन थाळी चिकन थाळी व विशेष म्हणजे भिगवन चे प्रसिद्ध असणारे मासे थाळी सुरू केली आहे.

 

महाराष्ट्राच्या परंपरेनुसार शाकाहारी असो किंवा मांसाहारी या बंधूंनी आपल्या ग्राहकांसाठी अप्रतिम चव, स्वच्छता आणि नम्रता या गुणांमुळे भुरळ घालत आहे.

पाचरणे ऍग्रो फार्म संचालित हॉटेल मटण कंदूरी हे नगर पुणे रोडवर पुण्यापासून 90 किलोमीटर अंतरावर तर शिरूर पासून 35 किलोमीटरच्या अंतरावर व नगर शहरापासून पाच ते दहा किलोमीटरच्या अंतरावर असून , मटण शौकीन तसेच प्रवासी या हॉटेलला प्रथम पसंती देताना दिसत आहेत व भिगवन ची सुप्रसिद्ध मच्छी सुद्धा खवय्यांना परत परत येण्यासाठी अनोखी मेजवानी असणारे आहे .

*कंदुरी मटन * या नावाने अल्पावधीतच खवय्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणार निसर्गाच्या सानिध्यातील हे हॉटेल महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जोपासणार आहे ,कारण आई वडील यांच्या कृपाशीर्वादाने त्यांना दैवत मानून त्यांच्या हस्ते उद्घाटन करत एक आगळावेगळा आदर्श समाजाला दिला गेला आहे.

दीपक पांडुरंग पाचरणे, अनिल पांडुरंग पाचारणे, तुषार पांडुरंग पाचारणे या भावंडांनी आपली आई सौ. मंदा पांडुरंग पाचरणे व वडील पांडुरंग भाऊ पाचरणे यांच्या हस्ते हॉटेल*कंदुरी मटण* या व्यवसायाचा उद्घाटन समारंभ मोठ्या थाटात पार पडला.

यावेळी कार्यक्रमाच्या वेळी विद्यमान सरपंच युवराज कारले, एडवोकेट राजेंद्र गावखेर, पोलीस पाटील रमेश रासकर, माजी सरपंच पोपटराव घुंगार्डे, चेअरमन दीपक कारले, नवनाथ गोंडाळ, अशोक साळुंखे, अरुण शेठ गोंडाळ ,आप्पा गवळी, मेजर सुभाष गोंडाळ, सुनील गोंडाळ ,स्वप्नील कारले, बाळासाहेब घोडके, दत्तात्रय पोटे, अनिल केदारे, रवी सातपुते ,निलेश इंगळे पोपट पोटे, उद्योजक अक्षय जपे, युवा उद्योजक अशोक फलके, राजेंद्र काळे, रमेश काळे, बाळासाहेब उदमले, उद्योजक बाळासाहेब पाचरणे, आदर्श शिक्षक राजेंद्र पोटे, युवा उद्योजक शाम केदारे, प्रसाद गायकवाड

तसेच पत्रकार पुणे ग्रामीण शोभा परदेशी , रियल स्टार किरण झांबरे , उद्योग अमृत साप्ताहिकचे संपादक अमृत झांबरे, महाराष्ट्र नामा चॅनलचे संपादक अनिल सोनवणे, शिवशाही न्यूज पुणे जिल्हा प्रतिनिधी फैजल पठाण आदी मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

एक वेळ आवश्यक भेट द्या पाचरणे ऍग्रो फार्म संचालित *कंदुरी मटण*(चास- कामरगाव) नगर- पुणे रोड, तालुका- नगर, जिल्हा अहमदनगर मोबाईल :-7020336765.

 

 

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 2 1 4 4
Users Today : 82
Users Yesterday : 503