एक लाख मतांनी शिवाजीराव (दादा) आढळराव पाटील यांना निवडून आणण्याची घोषणा : दौलतनाना उमाजी शितोळे…

Facebook
Twitter
WhatsApp

 

शिरूर प्रतिनिधी

दि. 14 एप्रिल 2024 रोजी शिरूर येथे जय मल्हार क्रांती संघटना राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, मनसे, आरपीआय, रासप, रयत क्रांती संघटना, जनसुराज्य पक्ष यांचे महायुतीचे अधिकृत उमेदवार

शिवाजीराव आढळराव पाटील, यांच्या प्रचारार्थ जय मल्हार क्रांती संघटना व शिरूर लोकसभा मतदार संघातील जय मल्हार क्रांती संघटनेचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, रामोशी, बेरड, बेडर समाज बांधव यांची बैठक घेऊन जाहीर पाठिंबा देण्यात आला.

जय मल्हार क्रांती संघटना ही महायुतीमध्ये सहभागी असल्याने महायुतीचे शिरूर सह सर्व लोकसभा मतदार संघातील भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना, आरपीआय, रासप, मनसे ,रयत क्रांती संघटना, जनसुराज्य, जय मल्हार क्रांती संघटना महायुतीचे लोकसभेचे सर्व उमेदवार निवडून आणण्याकरिता जय मल्हार क्रांती संघटना ही रामोशी, बेरड, बेडर समाजाचे सर्वाधिक मताधिक्य असणाऱ्या 14 लोकसभा मतदारसंघांमध्ये जाहीरसभा, कोपरासभा, बैठका घेवून, तसेच शिरूर लोकसभा मतदारसंघातून रामोशी, बेरड, बेडर समाजाच्या एक लाख मतांनी शिवाजीराव (दादा) आढळराव पाटील यांना निवडून आणण्याची घोषणा जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष लोकनेते दौलतनाना उमाजी शितोळे यांनी शिरूर येथिल बैठकी मध्ये केली.

 

यावेळी प्रमुख उपस्थिती पोपटराव गावडे

माजी आमदार, रवी बापू काळे, प्रदीप दादा कंद

, मानसिंग भैय्या पाचुंदकर

, राहुल दादा पाचर्णे, गौतम कदम, आबासाहेब सोनवणे

, रामभाऊ सासवडे, रवींद्र करंज खेडले, शरद भाऊ कालेवार, शिवाजी कुऱ्हाडे

, अमोल वार्पे, मयूर थोरात ,दादाभाऊ लोखंडे,

राजेंद्र गावडे, सुरेश गाडेकर, कैलास नरके, सुदाम चव्हाण , गणेश अण्णा बेंद्रे, रंजन झांबरे, दादासाहेब पवार, दौलतराव खेडकर, सौ प्रिया बिरादार, सौ रेशमा शेख, अंजली थोरात, रश्मी लोखंडे उपस्थित होते.

या कार्यक्रमात अनेक उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत महायुतीच्या अधिकृत उमेदवारांना पाठिंबा देत निवडून आणण्याची ग्वाही दिली.

तसेच रोहिदास दादा मदने, आप्पा चव्हाण , सुधीरजी दादा नाईक, बाळासाहेब भाऊ शिरतार, गणेश भाऊ गावडे, मच्छिंद्र अण्णा बोडरे , शंकर गोपने , बाळासाहेब शितकल, किरण भंडलकर, सुदर्शन मंडले , सुधीर खोमणे, दिनेश भाऊ चव्हाण ,आबासाहेब शितोळे, किरण भाऊ जाधव, सुधीर भाऊ मोरे ,चंगू भाऊ गायकवाड

यांच्यासह जय मल्हार क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य, शिरूर लोकसभेतील सर्व तालुक्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तमाम रामोशी, बेरड, बेडर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 4 2 1 4 4
Users Today : 82
Users Yesterday : 503