प्रतिनिधी . संतोष साळुंके
मांडवगण फराटा : लहान मुलांचे पोलिओपासून संरक्षण व्हावे आणि बालकांचे आरोग्य सुदृढ राहावे, या उद्देशाने रविवार, दि. २२ नोव्हेंबर रोजी मांडवगण फराटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेचा शुभारंभ मांडवगण फराटा-वडगाव रासाई जिल्हा परिषद गटाच्या विद्यमान सदस्या सौ. सुजाता भाभी पवार यांच्या हस्ते बालकांना पोलिओ डोस पाजून करण्यात आला.

यावेळी पंचायत समिती सदस्य संगीता किशोर फराटे, सीमाताई फराटे, संभाजीअप्पा फराटे,शरदराव चकोर,रावसाहेब जगताप.आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी, लहान बालके, पालक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक पालकाने आपल्या पाच वर्षांखालील बालकांना पोलिओचे दोन थेंब अवश्य पाजावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

पल्स पोलिओ मोहिमेच्या माध्यमातून बालकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी आरोग्य विभागाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत असून, या उपक्रमाला ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.





Users Today : 12
Users Yesterday : 278