Breaking News
कानगाव. येथील उद्योजक बबन शेठ फडके पाटील यांचा बेरोजगार तरुणांना रोजगाराचा आधार! इनामदार वस्ती परिसरात बिबट्याची दहशत; शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दुष्काळाचे सावट बाजूला सारत मांडवगण फराटा बाजारपेठेत दिवाळीचा उत्साह; खरेदीसाठी नागरिकांची झुंबड *वसुबारस निमित्त शिरूर शहरात विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने भव्य गोमाता पूजन सोहळा उत्साहात संपन्न!* शिरूरमध्ये अवैध दारूविक्रीविरोधात शिवसेना महिला आघाडी आक्रमक…. पोलीस निरीक्षकांना निवेदन; कठोर कारवाईची मागणी. मांडवगण फराटा येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी भक्तिरसाची बरसात छोटे माऊली महाराज कदम यांच्या सुश्राव्य कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध

कानगाव. येथील उद्योजक बबन शेठ फडके पाटील यांचा बेरोजगार तरुणांना रोजगाराचा आधार!

Facebook
Twitter
WhatsApp

प्रतिनिधी . संतोष साळुंके

औद्योगिक वसाहतीमध्ये तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी नेहमीच तत्पर; सामाजिक बांधिलकी जपणारे तरुण उद्योजक

दुष्काळग्रस्त भागातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत कान गाव येथील उद्योजक बबन शेठ फडके पाटील यांनी सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण घालून दिले आहे.

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि बेरोजगारीमुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या तरुणांना रोजगार मिळावा, या उद्देशाने त्यांनी पुढाकार घेतला आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये स्थानिक तसेच गरजू तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी बबन शेठ फडके पाटील हे नेहमीच तत्पर असतात. तरुणांच्या हाताला काम मिळावे, त्यांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे आणि त्यांच्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य लाभावे, यासाठी त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरू असतात.

उद्योजकतेसोबतच सामाजिक कार्याची आवड जोपासणारे बबन शेठ फडके पाटील हे नेहमीच समाजातील गरजू घटकांच्या मदतीसाठी पुढाकार घेत असतात. बेरोजगार तरुणांना केवळ मार्गदर्शन न करता प्रत्यक्ष रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा दृष्टिकोन निश्चितच कौतुकास्पद आहे.

आजच्या काळात बेरोजगारी ही तरुणांसमोरील मोठी समस्या असताना, औद्योगिक क्षेत्रातील आपल्या संपर्काचा आणि संधींचा उपयोग करून तरुणांना रोजगार मिळवून देण्याचे त्यांचे कार्य अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

“तरुणांच्या हाताला काम मिळाले, तर कुटुंबाचे भविष्य उज्ज्वल होते आणि समाजाची प्रगती होते,” या विचारातून कार्य करणारे कान गाव येथील उद्योजक बबन शेठ फडके पाटील यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

ज्या गरजू तरुणांना रोजगाराची गरज आहे त्यांनी
7020118043 या नंबर वर संपर्क करावा असे आवाहन उद्योजक बबन शेठ फडके पाटील यांनी केले आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 9 7 4 5 1
Users Today : 153
Users Yesterday : 30