सभासदांची दिवाळी दोनशे रुपये देऊन गोड , मागील हंगामातील गळीतास ऊस आलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोफत साखर वाटणार…….. चेअरमन बाबूराव बोत्रेपाटील
प्रतिनिधी .संतोष साळुंके
हिरडगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर येथील गौरी शुगर अँड डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेड युनिट ४ या कारखान्याचा चौथा बॉयलर अग्निप्रदिपन ,गळीत हंगाम शुभारंभ ओंकार शुगर ग्रुपचे अध्यक्ष तथा अशोक नागरी सहकारी बँक पिंपरी पुणे चे संस्थापक अध्यक्ष बाबुराव बोत्रे पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी रेखाताई बोत्रे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला .यावेळी पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यातील पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते .यावेळी उपस्थितीमध्ये ओंकार शुगर ग्रुपचे संचालक ओमराजे बोत्रे पाटील, रेखाताई बोत्रे पाटील,ओंकार शुगर ग्रुप ची सीईओ अश्विनीताई बरगे मॅडम,सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस, मा. चेअरमन महादेव फराटे, पंचायत समिती मा सदस्य लक्ष्मण बापू फराटे, संचालक खंडेराव फराटे, मा .चेअरमन प्रमोद गरुड पाटील,दादा भोसले,बापू चकोर , सर्व कारखान्याचे सर्व विभागांचे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी वर्गआदी उपस्थित होते.

यावेळी प्रास्तविकामध्ये लक्ष्मण बापू फराटे यांनी कारखान्याचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांच्या जीवनपट सांगितला, तर कारखान्याचे शेतकी अधिकारी करमळकरसाहेब यांनी कारखान्याचा लेखाजोखा सांगताना कारखाना गळीतासाठी सज्ज असून ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त गौरी शुगर ला द्यावा असे आवाहन केले.मनोगत व्यक्त करताना टिळक भोस, नवनाथ दादा शितोळे, तसेच लक्ष्मण बापू फराटे यांनी बोलताना बाबूराव बोत्रेपाटील यांनी मांडवगण फराटा येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेमध्ये खत विभागामध्ये कामाचा दांडगा अनुभव असून त्यांनी शिरूर हवेलीचे माजी आमदार कै.बाबूरावजी पाचर्णे साहेबांच्या संपर्कामधून शासकीय अधिकारी, प्रतिष्ठित मान्यवरांच्या, तसेच सहकारातला अनुभव आत्मसात केला. यातूनच त्यांनी बंद पडलेल्या साखर कारखान्यांना संजीवनी देऊन खऱ्या अर्थाने ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर नवचैतन्य निर्माण केले. टिळक भोस यांनी बोत्रे पाटलांचा चिकाटीचा व अहोरात्र मेहनतीचा अनुभव व्यक्त करताना बाबूराव बोत्रेपाटील शेतकऱी कुटुंबात जन्मले असून त्यांना शेतकऱ्यांची कष्टाची जाणीव असल्याचे सांगितले.

यावेळी अध्यक्षीय भाषणांमध्ये ओंकार शुगर ग्रुप चे तथा गौरी शुगर कारखान्याचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे पाटील यांनी सांगितले की ओंकार शुगर ग्रुपच्या माध्यमांतून जवळपास चार राज्यामध्ये २७ कारखाने असून बाहेरील देशांमध्ये ओंकार शुगर ग्रुपचे नाव साखर कारखानदारी व्यवसायामध्ये ठसले आहे. सर्व मिळून 35 कारखाने कार्यरत असल्याचे यावेळी सांगितले.तसेच सभासदांचा एक रुपये शेअर न घेता गौरी शुगर कारखाना चालविला आहे

तसेच गौरी शुगरच्या माध्यमांतून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गळीत हंगामापूर्वी मागील हंगामातील उसाची बिलापैकी उर्वरित दोनशे रुपयांची अतिरिक्त रक्कम दिवाळीपूर्वी सभासदांच्या खात्यात जमा करून दिवाळी गोड करण्यात येईल .तसेच सर्व उत्पादक शेतकऱ्यांना कारखान्याला ऊस गळीतासाठी दिलेल्या उसाच्या प्रमाणात साखर मोफत दिली जाईल . तसेच दुष्काळामुळे पाण्यामुळे बेडसवणारा प्रश्न उपस्थित करताना उसाचे प्रमाण कमी झाले आहे ,त्यामुळे सर्व उपस्थित ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त हा आपल्याच कारखान्याला देऊन आपल्या कारखाना आसपासची बाजारपेठ मोठी करण्यास मदत करावे तसेच सभासदांना जिल्ह्यात उच्चांकी बाजारभाव देण्याचेही आश्वासन यावेळी दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल चव्हाण यांनी केले, तर आभार नवनाथ दरेकर यांनी मानले.






Users Today : 103
Users Yesterday : 526