Breaking News
गौरी शुगर अँड डिस्टीलरिज प्रा. लिमिटेड चा बाॅयलर अग्निप्रदिपन गळीत हंगाम ,मोफत साखर वाटप शुभारंभ संपन्न मांडवगण फराटा येथे शिरूर हवेलीचे आमदार माऊली आबा कटके यांचा जनसंवाद दौरा आयोजन उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांच्याविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर; पदावरून हटविण्याचा निर्णय मांडवगण फराटा येथील माऊली मंदिरात अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन हरिनामाच्या गजराने माऊली मंदिर परिसर दुमदुमणार; भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण मांडवगण फराटा येथे श्री वाघेश्वर कांस्यथाळी थेरपी अँड वेलनेस सेंटरचे दिमाखात उद्घाटन…. प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अखिलेश राजुरकर सर यांच्या हस्ते उद्घाटन; परिसरातील नागरिकांना निसर्गोपचाराचा लाभ मिळणार आहे… सिस-पे घोटाळ्यात तळेगाव ढमढेरे येथील तलाठी दशरथ रोडे ला अटक … ११५ कोटींच्या मालमत्ता जप्तीला मंजुरी, आणखी ६० कोटींचा प्रस्ताव सादर

उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांच्याविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर; पदावरून हटविण्याचा निर्णय

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
शिरूर नगरपरिषदेच्या राजकारणात आज पुन्हा एकदा मोठी घडामोड घडली असून, उपनगराध्यक्ष मितेश प्रदीप गादिया यांच्याविरोधात मांडण्यात आलेला अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाला आहे. शुक्रवार, दि. ३० ऑक्टोबर रोजी नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांच्या अध्यक्षतेखाली रसिकभाऊ धारीवाल सभागृहात झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

ठरावाच्या बाजूने २० मते पडल्याने मितेश गादिया यांना उपनगराध्यक्ष पदावरून हटविण्याची घोषणा नगराध्यक्षांनी केली.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ मधील कलम ५५-१अ अन्वये ही विशेष सभा आयोजित करण्यात आली होती. नगरपरिषदेतील १८ नगरसेवकांनी उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांचे कामकाज असमाधानकारक असल्याचे नमूद करीत त्यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यासाठी विशेष सभा बोलावण्याची मागणी केली होती. यासंदर्भातील सूचना नोटीस दि. २६ ऑक्टोबर रोजी नगराध्यक्षांना देण्यात आली होती.


त्यानुसार आज सकाळी ११ वाजता विशेष सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू झाले. सभेच्या सुरुवातीला एकूण २८ सदस्यांपैकी २७ सदस्य उपस्थित होते. मात्र, उपनगराध्यक्ष मितेश गादिया यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सहा नगरसेवकांनी सभात्याग केला.
यामध्ये मितेश प्रदीप गादिया, स्वप्नाली योगेश जामदार, सुनीता संतोष पोटे, चारुशिला गणेश कोळपकर, रवी ऊर्फ शाम मनोहर ढोबळे आणि अमोल दादासाहेब चव्हाण यांचा समावेश होता.


दरम्यान, सभेमध्ये उपनगराध्यक्षांना पदावरून हटविण्याच्या बाजूने २० मते पडली. त्यामुळे अविश्वास ठराव बहुमताने मंजूर झाल्याचे जाहीर करत नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे यांनी मितेश गादिया यांना उपनगराध्यक्ष पदावरून काढून टाकण्याचा निर्णय घोषित केला.
या निर्णयामुळे शिरूर नगरपरिषदेतील सत्तेच्या राजकारणाला नवे वळण मिळाले असून, आगामी काळात नगरपरिषदेतील राजकीय समीकरणे कशी बदलणार, याकडे शिरूरकरांचे लक्ष लागले आहे.

 

शिरूर नगरपरिषदेच्या राजकारणात मोठी उलथापालथ!

नवीन उपनगराध्यक्षपद कुणा कडे?

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 9 6 5 9 6
Users Today : 103
Users Yesterday : 526