Breaking News
मांडवगण फराटा येथील यश वेठेकर CBSE आर्मी पब्लिक स्कूल राष्ट्रीय कबड्डी संघाचा कर्णधार. सीबीएसई नॅशनल कबड्डी स्पर्धेत आर्मी पब्लिक स्कूल पुणे यू-१७ संघाचे कर्णधारपद भूषवत कांस्यपदकावर मोहर वडगाव मावळ: पैसा फंड ते विशाल लॉन्स रस्ता बनला ‘डेथ ट्रॅप’; खड्डे आणि कचऱ्यामुळे नागरिकांचा जीव धोक्यात! प्रथमेश अशोक ढाकणे यांना युवारत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले…. अंगारकी चतुर्थीनिमित्त म्हसोबावाडीच्या सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची अलोट गर्दी ‘नवसाला पावणारा गणपती’ अशी श्रद्धा; एक हजारांहून अधिक भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ शिरूर मध्ये हॉटेल चालक महिलेस बेदम मारहाण….. गणेगाव दुमाला विविध कार्यकारी सोसायटीची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात

मांडवगण फराटा येथील यश वेठेकर CBSE आर्मी पब्लिक स्कूल राष्ट्रीय कबड्डी संघाचा कर्णधार. सीबीएसई नॅशनल कबड्डी स्पर्धेत आर्मी पब्लिक स्कूल पुणे यू-१७ संघाचे कर्णधारपद भूषवत कांस्यपदकावर मोहर

Facebook
Twitter
WhatsApp

प्रतिनिधी संतोष साळुंके

मांडवगण फराटा : मांडवगण फराटा येथील विद्यार्थी यश बाळासाहेब वेटेकर याने आपल्या उत्कृष्ट कबड्डी कौशल्याच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर

मांडवगण फराटा गावाचे नाव अभिमानाने उंचावले आहे. उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे पार पडलेल्या सीबीएसई नॅशनल कबड्डी स्पर्धेत आर्मी पब्लिक स्कूल, पुणेच्या यू-१७ संघाचे कर्णधारपद यश वेठेकर याने समर्थपणे सांभाळले.

यू-१७ संघाचे कर्णधारपद भूषविण्याचा मान मिळवत, यशने मैदानावर संघाचे प्रभावी नेतृत्व केले. त्याच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या आर्मी पब्लिक स्कूल, पुणे यू-१७ संघाने दमदार कामगिरी करत कांस्यपदक पटकावले.

राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या स्पर्धेत मांडवगण फराट्याच्या यश वेटेकरने पुणे येथील आर्मी पब्लिक स्कूल यू-१७ संघाचे कर्णधारपद भूषविणे ही मांडवगणकरांसाठी अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे. यशच्या या यशामुळे परिसरातील युवा खेळाडूंना निश्चितच प्रेरणा मिळाली आहे.

 

याच स्पर्धेत महाराष्ट्राच्या यू-१४ आर्मी पब्लिक स्कूल, पुणे संघाने सुवर्णपदक पटकावत महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.

यश बाळासाहेब वेठेकर याच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मांडवगण फराटा ग्रामस्थ, क्रीडाप्रेमी आणि नागरिकांकडून हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून, त्याच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 9 3 9 3 3
Users Today : 4
Users Yesterday : 32