शिरूर येथे,गोळी बारात हरिष गंगावणे ठार…… जबाबदार कोण…..

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:

मित्रा मित्रां मध्ये पूर्वीचे वैमनस्य होते , मर्डर च्या रात्री पत्त्यांवरून वाद झाला होता अशी चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू असताना, सकाळी गोळीबारात हरिष गंगावणे झाला जागीच ठार झाला .

परंतु पोलिसांनी गुन्हा दाखल केला तो दोन लाख रुपयांच्या वादावरून भांडण व गोळीबारात मृत्यू झाला .

या सर्वा मध्ये एकाला आपला जीव गमवावा लागला.त्याचे खरे कारण ,शिरूर शहरात जोरात सुरू असलेल्या अनेक अवैद्य धंदे.

जुगार ,पत्ते, मटका,दारू ,क्लब व ऑनलाइन सट्टा

 

एवढे सर्व शिरूर शहरात सरासपणे सुरु आहे व पोलिसांना याची कल्पना नसावी? हे खरे असावे का?

शिरूर पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस ,अधिकारी यांना शहरातील साध्या पान टपरी पासून तर हॉटेल पर्यंत सर्व माहिती असेल.मग या अवैद्य धंद्याबाबत माहिती नसेल का?
आणि नसेल तर ,का नाही? त्यांची ही ड्यूटी असताना,पोलिस अधिकारी काय करतात ? फक्त जीव जाण्याची वाट पाहत असतात का व नंतर घटना घडली की घटना स्थळी जाऊन पंच नामा करतात. यात गेलेला जीव परत येतो की त्याचा जीव घेणाऱ्या ला शिक्षा होते की ज्यामुळे परत असा गुन्हा करताना,आरोपी घाबरेल?

यातील काहीच होत नाही , त्यामुळे कायदा-सुव्यवस्थेवर सवाल निर्माण होत आहे. “सध्या पैसा फेको , तमाशा देखो” असे तर नाही ना? पैसा असेल तर आपण काही ही करू शकतो व आपल्याला कुणीच काही करू शकत नाही,अशी समाजाची समजूत झाली आहे.

याला आळा घालायचा असेल तर “तुकाराम मुंडे” सारखा अधिकारी होणे गरजेचे आहे.त्यांच्या भीतीने संपूर्ण महाराष्ट्रात भीती निर्माण झाली आहे,त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे शिरूर शहरातील नावाजलेले चायनीज हॉटेल ठरत आहे,पूर्वी येथील नूडल्स मध्ये भरपूर प्रमाणात कलर दिसत होता पण आता नसतात.

असाच अधिकारी आपल्या शिरूर पोलिस स्टेशन ला मिळाला तर,असे अवैद्य धंदे करणारे व छोट्या छोट्या कारणावरून जीव घेणारे दहा वेळा विचार करतील.कायद्याची भीती वाटेल.

शिरूर शहरात फक्त रोड वरील काळ्या काचा ,लायसन पाहून काही होणार नाही तर येवढ्या छोट्या मुलांकडे बंदूक कुठून आली,त्यांना कोण देते आहे, शहरात चालणाऱ्या अशा धंद्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे. कारण आजच्या पिढी फक्त देखावा व पैसा कमवण्यासाठी काही ही करू शकते.

हे कल्ब ,जुगार,सट्टा असेच कुणाच्या तरी कृपेने सुरू राहिले तर अजून बरेच हरीष आपल्यातून जातील. काल घडलेला गोळीबार हा पाहीला च नाही तर वर्ष भरात बरेच झाले आहेत यात जाणारा जातो,करणारा तुरुंगात जातो,जामीन मिळतो परत बाहेर येतो व हे सर्व घडते कसे,त्याच्या कडे बंदूक आली कुठून व देणाऱ्या वर कारवाई होते की नाही ? हे गुल दस्त्यात राहते.
हरीष गंगावणे प्रकरणात ज्या जुगार अड्यावर पत्त्या वरून या भांडण ला सुरवात झाली,त्यावर पोलिस प्रशासन कारवाई करेल का ?
केली तर भविष्यातील अनेक वाद निर्माण होऊन जाणारे जीव वाचतील . पोलिस प्रशासन काय कारवाई करते, शिरूर शहरातील हे धंदे बंद होतील का ?

 

की मी मारतो ,तू रडल्या सारखे कर, असेच सुरू राहणार.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 9 2 0 2 5
Users Today : 629
Users Yesterday : 26