उद्योजक विश्वातील एक तारा हरपला … शिरूरचे प्रसिद्ध कुशन व्यावसायक लालचंद अडसूळ यांचे निधन…

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी :
शिरूर तालुक्यातील व शहरातील प्रसिद्ध कुशन व्यावसायिक कै. लालचंद काशिनाथ अडसूळ (वय 68 वरषे), यांचे दीर्घ आजाराने दि. 11 /09/2026 रोजी दुःखद निधन झाले.

कै.लालचंद अडसूळ हे शिरूर शहरातील “अडसुळ सिट कव्हर “या व्यवसायासाठी परिचित ” होते.
आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी शहरात स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. त्यांची हिच ओळख व कामाचा वारसा जपत ,त्यांच्या विशाल व तुषार या मुलांनी शिरूर नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात “अडसुळ कार डेकोर “या नावाने अनेक शॉप उभारले आहेत.
काही वर्षांपूर्वी घरात पाय घसरून पडल्या मुळे त्यांना स्पाऊन इंजुरी झाल्यामुळे लालचंद अडसुळ यांनी बरेच वर्ष अंथरुणात पडून रहावे लागले,परंतु,त्यांच्या मुलांनी डॉक्टर सांगतील ते सर्व प्रयत्न,करत महाराष्ट्राबरोबर,बाहेरील राज्यात उपचार केले.

“ मृत्यू हा अटळ आहे “ व एक सत्य आहे, याच प्रमाणे स्वर्गवासी लालचंद अडसुळ यांना आपल्यातून जावे लागले.

 

त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे, तुषार अडसूळ व विशाल अडसूळ यांचे ते वडील होते.
कै,.लालचंद अडसूळ यांच्या निधनाने अडसूळ कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच शिरूर शहरातील व्यावसायिक क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांचा दशक्रिया विधी :
रविवार दि.20/09/2026रोजी सकाळी 8 वाजता,शिरूर येथील कुंभार घाट येथे आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 9 1 1 3 0
Users Today : 39
Users Yesterday : 29