शिरूर प्रतिनिधी:
स्वराज्य रक्षक फाउंडेशन व पुणे ग्रामीण न्युज यांच्या संयुक्त विद्यमानाने घेण्यात येणारी महिला दही हंडी दि.६/०९/२०२६ रोजी रयत शिक्षण संस्थाच्या ग्राउंड वर घेण्यात आली.

या दही हंडी स्पर्धेत शिरूर तालुक्यातील अनेक शाळा सहभागी होतात. यावेळी अभिनव विद्यालय सरदवाडी, कारेश्वर इंग्लिश मिडीयम कारेगाव,आय.टी.के बी कराटे क्लास शिरूर, शितोळे पोलीस ॲकॅडमी शिरूर व सिताबाई थिटे डी.फार्म कॉलेज शिरूर यांनी आपला सहभाग नोंदवला.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शिरूर नगरीच्या नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे उपस्थित होत्या.तसेच या कार्यक्रमाला नगरसेविका संगीता मल्लाव, नगरसेवक सागर नरवडे यांच्या पत्नी,शशिकला काळे,प्रिया बिराजदार, सुवर्णा सोनवणे, उषा वाखारे,डॉ. वैशाली साखरे व रिटा गुजर उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन पत्रकार अमृत झांबरे व अर्जुन बढे यांनी केले. तर कार्यक्रमाचे पंच म्हणून महेबुब सय्यद,पत्रकार फैझल पठाण व राणी शिवाजी बनकर यांनी केले.

या कार्यक्रमाची सुरवात नगराध्यक्ष ऐश्वर्याताईनच्या हस्ते दीपप्रजोलन करून व शिवाजी महाराजांच्या आरतींने करण्यात आली.
सर्व संघानी प्रथम दही हंडी ला सलामी दिली,नंतर,प्रत्येक संघाच्या नावाने चिठ्या टाकत क्रमवारीज दही हंडी फोडण्याचा प्रयत्न सर्व खेळाडूनी केला.चार ही संघांतील खेळाडू चे प्रयत्न पाहता,शिरूर च्या नगराध्यक्ष,कार्यक्रमाचे आयोजक व पंच यांनी दोन्ही बक्षीस चार ही संघाना विभागून दिले.

यावेळी नगराध्यक्ष ऐश्वर्याताई यांनी उपस्थित असणाऱ्या मुलीच्या रक्षणासाठी स्टेज सोडून ग्राउंड वर जात मुलीचे धैर्य वाढत पुढील वर्षी,या महिला दही हंडी साठी लागणारी कोणती ही मदत आपण करणार आहोत व तसेच शिरूर तालुक्यातील जास्तीत जास्त शाळा व कॉलेज यांनी आपला सहभाग नोंदवावा,अशी ग्वाही दिली.
यावेळी पत्रकार, मुकुंद ढोबळे,धुमाळ पत्रकार,फैजल पठाण, अर्जुन बढे,सुदर्शन दरेकर, अमृत झांबरे, महेबुब सय्यद, पाचंगे पत्रकार,किरण झांबरे, अश्विनी सांगळे,रूपाली खिलारी,सुवर्णा नळकांडे, सह विक्रम ठाकूर ,सुजित लिमन,प्रत्येक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिरूर तालुक्यातील अनेक पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाला यशोदा ग्रुप,प्रथमेश मसाले,राधानगरी प्लॉट तसेच रुबी हॉल हॉस्पिटल चे विशेष सहकार्य लाभले व या दही हंडी साठी ट्रॉफी व बक्षीस शिरूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष ऐश्वर्याताई पाचर्णेव नगरसेवक सुनील दादा जाधवयांच्या वतीने देण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी स्वराज्य रक्षक फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी ,पुणे ग्रामीण न्यूज चे सर्व पत्रकार व शिवश्री न्यूज चॅनेल ची सर्व पदाधिकारी व शिरूर शहरातील सर्व महिला भगिनींनी प्रयत्न केले.





Users Today : 139
Users Yesterday : 31