प्रतिनिधी.संतोष साळुंके
दि. २२ ऑगस्ट २०२६ : इनामगाव परिसरातील नागरिकांमध्ये गेल्या काही काळापासून भीतीचे वातावरण निर्माण करणारा नरभक्षक बिबट्या अखेर वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आला आहे. बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवून त्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून गेल्या दोन वर्षांपासून अथक प्रयत्न सुरू होते. अखेर आज पहाटे लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

मौजे इनामगाव, नळगे मळा येथील लावलेल्या सापळ्यात आज दिनांक २२/०८/२०२६ रोजी बिबट्या जेरबंद करण्यात आला. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वनविभागाने तात्काळ उपाययोजना करून ही कारवाई केली.

या कारवाईत उपवनसंरक्षक श्री. प्रशांत खाडे, सहाय्यक उपवनसंरक्षक स्मिता राजहंस, मंडल वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. निळकंठ गव्हाणे, वनपाल भानुदास शिंदे, मेजर वनरक्षक जालिंदर सानप, शेखर जानगवळी, गणेश झिरपे, गणेश डोईफोडे, नाना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नवनाथ गांधळे, गोविंद शेलार, मनोज चौधरी, शरीफ शेख, सुधीर शितोळे, सुनील कळसकर, अमोल पाटोळे, शरद गदादे, राहुल अवचिते, रोहिदास शेंडगे, संदीप गव्हाणे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

बिबट्याच्या हालचालींच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वनविभागाने नियोजनबद्ध पद्धतीने तात्काळ उपाययोजना केल्या. त्यानंतर लावलेल्या सापळ्यात बिबट्या जेरबंद करण्यात आला.

दोन वर्षांच्या अथक प्रयत्नांना मिळालेले हे यश असून, वनविभागाच्या या कारवाईमुळे इनामगाव,मांडवगण फराटा, पिंपळसुटी परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.





Users Today : 30
Users Yesterday : 323