शिरूर प्रतिनिधी:
शिरूर तालुक्यातील शिरूर ग्रामीण,महाजनमळा येथील सामान्यशेतकरी कुटुंबातील सुमित महाजन हेरुग्णवाहिका चालक म्हणून कामकरतआहेत.डॉक्टरांपर्यंत पेशंट वेळेवर पोहचत अनेकांचे प्राण वाचवण्याचे काम त्यांच्या हातून कायम घडत असते.

परंतु दि.१३ ऑगस्ट रोजी संध्याकाळच्या सुमारास एक माणूस घोड नदीत उडी मारत असल्याचे पाहून त्यांनी तात्काळ स्वतः च्या जीवाची पर्वा न करता गाडी साईड ला घेत त्या माणसाला नदीत उडी मारण्या पासून वाचवले व त्याला जीवनदान दिले.

काही पत्रकारानच्या मदतीने त्याला शिरूर पोलिस स्टेशन च्या स्वाधीन केले.

धाडसीपणाचा व माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या सुमित महाजन यांचा शिरूर शहरात नुकताच नगरी सत्कार करण्यात आला.





Users Today : 108
Users Yesterday : 154