प्रतिनिधी . संतोष साळुंके
तारीख .१९ ऑगस्ट २०२६
दौंड तालुक्यातील राहूजवळील सोनवणेमळा परिसरात आज सकाळी विजेच्या धक्क्याने दोन चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून, भोईटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ओम नितीन भोईटे (वय १८) आणि रोहित अनिल भोईटे (वय २१) हे दोघे चुलत भाऊ घरातील नेहमीचे काम सुरू असताना विजेच्या धक्क्याच्या दुर्घटनेत गंभीररीत्या बाधित झाले. आज सकाळी अचानक घडलेल्या या घटनेत दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.
दोन्ही तरुण घरातील कामात मदत करणारे होते. सकाळचा दिवस नेहमीप्रमाणे सुरू असतानाच काही क्षणांत घडलेल्या या दुर्घटनेने कुटुंबीयांवर मोठा आघात झाला. आनंदाने वावरणारी ही दोन तरुण मुले अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने कुटुंबीयांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा आहे.

या घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दोन्ही तरुणांच्या अकाली निधनाने राहू व सोनवणेमळा परिसरात हळहळ व्यक्त होत असून, भोईटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.





Users Today : 1
Users Yesterday : 154