सुप्यामधील निरामय हॉस्पिटलने घेतला जीव…..

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
पारनेर तालुक्यातील सुपा येथील निरामय हॉस्पिटल ने एका शेतकऱ्याला साधा ताप आला म्हणून ICU मध्ये दाखल करत, हजारो रुपये खर्च लावलाच , शिवाय तो कशाने मृत्युमुखी पडला हेही डॉक्टरांना सांगता आले नाही.

नेहमी प्रमाणे सकाळी लवकर उठून गोठ्यातील सर्व कामे आटोपून,दूध काढून व ते दूध डेयरी ला जाऊन देऊन आल्या नंतर,थोडा ताप आल्या सारखे वाटले म्हणून घरच्यांनी त्यांना हॉस्पिटल मध्ये जाऊन एखादे इंजेक्शन घेऊन या म्हणून सांगितल्या प्रमाणे,ते सुपा येथील निरामय हॉस्पिटल मध्ये गेले.
साधा ताप आहे म्हणून,त्यांची बायको शेतात काम करण्यासाठी गेली व इंजेक्शन घेऊन शेतात या म्हणून तिने तिच्या नवऱ्याला सांगितले.
थोड्यावेळात तिला हॉस्पिटल मधून कॉल आला ,साबळे यांना ICU मध्ये दाखल केले आहे.
साबळे कुटुंबातील व्यक्ती हॉस्पिटल मध्ये पोहोचल्या नंतर,साबळे यांना का ICU मध्ये दाखल केले,साधा ताप आला होता याचे उत्तर मिळेपर्यंत,ते पेशंट मृत्यू मुखी पडले.
या सर्व प्रकाराने डॉक्टर दोषी असावेत,काही तरी चुकीच्या उपचार पद्धतीचा वापर व ICU मध्ये पेशंट गेले तर जास्त पैसे मिळतील या आशेने निरामय हॉस्पिटल ने एका निष्पाप शेतकरी कुटुंबाचा आधारवड हिरावून घेतला.
अशा हॉस्पिटल चा लायसन रद्द करत,डॉक्टर ला शिक्षा होणे गरजेचे आहे

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 9 7 0 4
Users Today : 1
Users Yesterday : 154