Breaking News
केसनंद ग्रामपंचायतीतील कथित बनावट कागदपत्र प्रकरण; कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा शिरूर ग्रामीण चा ढिसाळ कारभार…. महिला व लहान मुले भीतीच्या छायेत…. ज्ञानेश्वर माऊली प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाची निवड; उत्तम भाऊ फराटे अध्यक्षपदी संग्राम हॉटेलसमोर कंटेनरची कारला धडक; त्यानंतर शिवाई बसही धडकली … मोटारसायकलस्वाराचाही दुर्दैवी अंत राष्ट्रीय युद्धकला स्पर्धेत राजमाता जिजाऊ आखाड्याचा डंका! आपटीच्या बेपत्ता महिलेचा पाच दिवसांनी भीमा नदीत मृतदेह दहा महिन्यांच्या बाळाला घरी ठेवून झाली होती बेपत्ता; ड्रोनसह अग्निशमन दल, आपदामित्रांच्या मदतीने शोधमोहीम

केसनंद ग्रामपंचायतीतील कथित बनावट कागदपत्र प्रकरण; कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

Facebook
Twitter
WhatsApp

वाघोली:प्रतिनिधी:विनायक साबळे

केसनंद ग्रामपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या कामात कथित बनावट व फेरफार केलेल्या वृत्तपत्रांच्या प्रती शासकीय अभिलेखात सादर केल्याच्या प्रकरणात संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी भाजपा पंचायत समिती हवेलीचे सदस्य कुशाल गोरख सातव यांनी १४ ऑगस्टपासून पंचायत समिती हवेली येथे आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

घनकचरा व्यवस्थापनाच्या कामाशी संबंधित शासकीय कागदपत्रांमध्ये २४ नोव्हेंबर २०२५, १८ डिसेंबर २०२५, ७ एप्रिल २०२६ आणि ८ एप्रिल २०२६ रोजीच्या कथित बनावट अथवा फेरफार केलेल्या वृत्तपत्रांच्या प्रती जोडण्यात आल्याचा आरोप सातव यांनी केला आहे.

या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर संबंधित वृत्तपत्र कार्यालयाने वाघोली पोलिस ठाण्यात निवेदन देऊन संबंधित जाहिर निविदा व वृत्तपत्रांच्या प्रती बनावट असल्याचे स्पष्ट केल्याचे सातव यांनी सांगितले आहे. तसेच पंचायत समितीच्या आदेशानुसार विस्तार अधिकारी पंचायत यांनी प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर केला असून, शासकीय दस्तऐवजांमध्ये कथित खोटी व बनावट कागदपत्रे समाविष्ट केल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याचे सातव यांनी निवेदनात म्हटले आहे.

या प्रकरणात संबंधित ग्रामसेवक, व इतर दोषींवर कोणताही विलंब न करता गुन्हा दाखल करावा, तसेच संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सातव यांनी केली आहे.

१४ ऑगस्टपूर्वी कारवाई न झाल्यास पंचायत समिती हवेली येथे आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे. शासकीय अभिलेखात बनावट कागदपत्रांचा वापर झाल्याचा आरोप गंभीर असून, या प्रकरणात राजकीय किंवा प्रशासकीय दबावाला बळी न पडता निष्पक्ष कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

दरम्यान, या प्रकरणात प्राथमिक चौकशी अहवाल, संबंधित वृत्तपत्रांच्या प्रती, निविदा कागदपत्रे, पोलिसांकडील निवेदन तसेच अन्य उपलब्ध पुरावे प्रशासनाकडे सादर करण्यात आल्याचे सातव यांनी सांगितले आहे.

प्रशासन आता कोणती भूमिका घेते याकडे हवेली तालुक्याचे लक्ष लागले आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 8 6 7 0
Users Today : 167
Users Yesterday : 99