शिरूर सतरा कमानी पुलावरून घोडनदीत उडी मारणाऱ्या महिलेचा मृतदेह सापडला आणि ओळख पटली

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर (प्रतिनिधी)
शिरूर येथील ऐतिहासिक सतरा कमानी पुलावरून घोडनदीच्या पात्रात उडी मारून आत्महत्या केलेल्या महिलेचा मृतदेह शोधण्यात दौलत शितोळे यांच्या आपत्ती व्यवस्थापन पथकाला यश आले असून, मृत महिलेची ओळख पटली आहे.

आशा दिलीप बोटकर (वय ४८, सध्या रा. कारेगाव, ता. शिरूर; मूळ रा. पारगाव मंगळूर, ता. जुन्नर, जि. पुणे) असे मृत महिलेचे नाव आहे.

दिनांक ६ ऑगस्ट रोजी शिरूर येथील सतरा कमानी पुलावर सायंकाळच्या सुमारास सदर महिला काही वेळ येरझाऱ्या घालत होती. त्यानंतर ती पुलावर बसली आणि अचानक तिने घोडनदीच्या पात्रात उडी घेतली होती. या घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस ठाण्याच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली होती.

हा मृतदेह श्रीगोंदा तालुक्याच्या हद्दीत आढळून आल्यामुळे या प्रकरणाची नोंद बेलवंडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर व तपासिक कारवाई बेलवंडी पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कॉन्स्टेबल शोभा काळे करीत आहेत.

आपत्ती व्यवस्थापन संघाचे आवाहन
कोणत्याही अडचणीत किंवा आपत्कालीन परिस्थितीत खचून न जाता त्वरित मदत मिळवण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


तात्काळ आपत्कालीन मदतीसाठी संपर्क:
+91 96738 42120 (दौलत शितोळे आपत्ती व्यवस्थापन संघ)

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 6 4 2 5
Users Today : 30
Users Yesterday : 279