वाघोली:प्रतिनिधी:विनायक साबळे
वाघोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी वाघोली पोलिसांनी मोठी कारवाई करत रेकॉर्डवरील चार सराईत गुन्हेगारांना तडीपार केले आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम 56(1)(अ)(ब) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून, संबंधित आरोपींना ठरावीक कालावधीसाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.
पोलीस उपायुक्त, परिमंडळ-७ यांच्या आदेशानुसार तानाजी अर्जुन जाधव (रा. केसनंद) आणि ओम दादाराव मस्के (रा. वाघोली) यांना दोन वर्षांसाठी, तर आकाश बाळू वायकर (रा. लोहगाव) आणि माखन भारत मिसार (रा. वाघोली) यांना एक वर्षासाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. या आदेशांची बजावणी गुरुवारी (६ ऑगस्ट) करण्यात आली.

शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर प्रभावी नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त संजय दराडे, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त अबिनाश कुमार, सहाय्यक पोलीस आयुक्त अनिता मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

या मोहिमेत पोलीस निरीक्षक (गुन्हे) पल्लवी मेहेर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चंदन, पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर राघू, तसेच सर्व्हेलन्स विभागातील पोलीस अंमलदार सागर कडू, शेखर शिंदे, कमलेश शिंदे, राकेश गायकवाड यांच्यासह परिमंडळ-७ कार्यालयातील जया थिटे आणि नवनाथ शिंदे यांनी सहभाग घेतला.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींविरोधात भविष्यातही अशाच प्रकारची कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचा इशारा वाघोली पोलिसांनी दिला आहे.






Users Today : 333
Users Yesterday : 26