शिरूर नगरपालिके चे कधी गटारातील पाणी रोडवर…. तर कधी रोड वरील चेंबर चे झाकण गटारात….

Facebook
Twitter
WhatsApp
शिरूर प्रतिनिधी:
शिरूर नगरपालिका अनेक पुरस्कार घेऊन,आम्ही बेस्ट आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न करत असते. मात्र शिरूर शहरातील नागरिकांना मात्र प्रश्न पडला आहे की,कशाचा पुरस्कार घेते ही शिरूर नगर परिषद आणि कसा घेते?
कारण स्वच्छता नाही,
अतिक्रमण “जैसे थे “ आहेच

कधी गटारातील पाणी रोड वर,तर कधी रोड वरील नागरिक गटारात पडतील अशी परिस्थिती असताना,शिरूर नगर परिषद कोणत्या कामावर पुरस्कार मिळवते?

शिरूर मधील स्टेट बँक कॉलनी रोड हा ,गोलेगाव ,निर्वि व पुढे अनेक गावांना जाण्यासाठी हा एकमेव रस्ता आहे.दररोज अनेक छोटी मोठी वाहने, शाळेचे विद्यार्थी व नागरिक या रोड ने ये जा करतात,याच रोड वरील चेंबर चे लोखंडी रॉड चे झाकण,कित्येक दिवसा पासून तुटले आहे,विशेष बाब म्हणजे त्या ठिकाणी दोन गाड्या शेजारून जाताना डाव्या बाजूच्या गाडीला चेंबर वरून गाडी घेऊन जावी लागते,अशात तुटलेल्या चेंबर मुळे अपघात झाला तर?

जबाबदार कोण?

नगरपालिका याकडे लक्ष देईल का? या वार्ड साठी निवडणूक लढवून जिंकून आलेले नगरसेवकांना,या गोष्टीचे गांभीर्य नाही का?मोठा अपघात झाला,तरच सर्व जागे होणार आहेत का?

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 5 5 1 7
Users Today : 1
Users Yesterday : 119