शिरूर प्रतिनिधी :
शिवशाही न्यूज नेटवर्कच्या चौथ्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राज्यभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय आणि अलौकिक कार्य करणाऱ्या गुणवंतांचा ‘शिवशाही महारत्न पुरस्कारा’ने अत्यंत दिमाखात सन्मान करण्यात आला. पंढरपूर येथील श्रीराम मंगल कार्यालय येथे आयोजित या भव्य सोहळ्यात, शिरूर नगरपरिषदेच्या नगरसेविका तथा विद्युत व पाणीपुरवठा सभापती डॉ. सुनिता संतोष पोटे यांना त्यांच्या उत्कृष्ट आरोग्य व समाजसेवेबद्दल ‘शिवशाही महारत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.
या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पदक विजेत्या ज्येष्ठ भारुड सम्राज्ञी चंदाताई तिवारी या होत्या, तर कार्यक्रमाचे उद्घाटन पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते पार पडले.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती:

या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी मंगेश चिवटे, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष सतीश सावंत, पंढरपूरच्या नगराध्यक्ष डॉ. प्रणिता भालके, माजी जिल्हा परिषद सदस्या ऋतुजाताई मोरे, मनसे नेते दिलीप धोत्रे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे, आम्ही शिरूरकर फाउंडेशनचे अध्यक्ष रवींद्र बापू सानप, मनसे पुणे जिल्हा उपाध्यक्ष महेबूब भाई सय्यद, शिरूर प्रवासी संघ अध्यक्ष अनिल बांडे, उद्योजक राजेंद्र खेतमाळीस, गोपी शेठ पठारे, शिवशाही न्यूज नेटवर्कचे मुख्य संपादक सचिन कुलकर्णी, कार्यकारी संपादक मनिषा कुलकर्णी यांच्यासह राजकीय, सामाजिक आणि माध्यम क्षेत्रातील अनेक दिग्गज मान्यवर मंचावर उपस्थित होते.
रस्त्यावरील प्रसुतीचा तो ‘थरार’ ठरला संवेदनशीलतेची ओळख:

‘आरोग्य हीच खरी संपत्ती’ असे म्हटले जात असले तरी आजच्या काळात हेच आरोग्य टिकवण्यासाठी सामान्यांना मोठी आर्थिक ओढाताण सहन करावी लागते. अशा काळात डॉ. सुनिता पोटे यांनी वैद्यकीय पेशाला केवळ व्यवसाय न मानता समाजसेवेचा वसा घेतला आहे. आपल्या पतीच्या खंबीर साथीने त्यांनी आजवर हजारो रुग्णांना अत्यंत अल्प दरात, तर अनेक गरजूंना मोफत आरोग्य सेवा पुरवली आहे.
राजकीय क्षेत्रात नगरसेविका व पाणीपुरवठा सभापती म्हणून कार्यरत असतानाच, त्यांनी दाखवलेली सामाजिक बांधिलकी कौतुकास्पद आहे. काही दिवसांपूर्वी रस्त्यावर प्रसुती वेदनेने कासावीस झालेल्या एका अत्यंत गरीब महिलेच्या मदतीला त्या धावून गेल्या होत्या. कोणत्याही आधुनिक सुविधा उपलब्ध नसताना, एखाद्या चित्रपटातील प्रसंगाप्रमाणे त्यांनी अत्यंत कौशल्याने व धैर्याने रस्त्यावरच त्या महिलेची यशस्वी प्रसुती केली होती. त्यांच्या या धाडसी व संवेदनशील कृत्याचे संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक झाले होते.
डॉक्टर सुनिता पोटे यांनी आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग सर्वसामान्यांच्या हितासाठी केला त्यामुळेच एक महिला डॉक्टर राजकारणात यशस्वी होऊ शकते हा वस्तू पाठ त्यांनी घालून दिला आणि पुण्यासारख्या जिल्ह्यातील शिरूर नगर परिषदेमध्ये त्या नगरसेविका म्हणून प्रचंड मतांनी निवडून आल्या हे त्यांचे मोठे यश आहे. आणि म्हणूनच शिवशाही महारत्न पुरस्कारासाठी त्या खरोखरच पात्र आहेत .
[रस्त्यावर यशस्वी डिलिव्हरी करून डॉक्टर सुनीता पोटे यांनी जनतेविषयी असलेली आपुलकी आणि बांधिलकी यांचे सर्वोच्च उदाहरण घालून दिले आहे त्यांना शिवशाही महारत्न पुरस्कार मिळाला ही त्यांच्या कामाची पोचपावती असून पांडुरंगाच्या नगरीत आणि माझ्या मतदारसंघात हा पुरस्कार त्यांना मिळाला ही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे.]






Users Today : 0
Users Yesterday : 119