शिरूर पोलिसांची जनजागृती बैठक; नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

Facebook
Twitter
WhatsApp
[सायबर गुन्हे व अंमली पदार्थांविरोधात समाजाने एकजुटीने लढा द्यावा : उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले]

शिरूर प्रतिनिधी : प्रकाश गवळी
सायबर गुन्हे आणि अंमली पदार्थांचे वाढते संकट रोखण्यासाठी केवळ पोलिस नव्हे, तर संपूर्ण समाजाने एकजुटीने पुढे येण्याची गरज असल्याचे प्रतिपादन उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र भोसले यांनी आज जनजागृती पर मिटिंग घेत केले.

शिरूर पोलिसांच्या वतीने आयोजित सायबर गुन्हे व अंमली पदार्थांविरोधातील जनजागृती बैठकीत ते बोलत होते. यावेळी पोलीस निरीक्षक विनोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नखाते, राकेश मुळीक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

भोसले यांनी सायबर फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी मोबाईलवर येणाऱ्या अनोळखी लिंक, APK फाईल किंवा बनावट लोन अॅप्स डाउनलोड करू नयेत, ओटीपी व बँकेची गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये, असे आवाहन केले. तसेच सायबर फसवणूक झाल्यास तात्काळ १९३० या राष्ट्रीय हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असेही त्यांनी सांगितले.

पोलीस उपनिरीक्षक हनुमंत नखाते यांनी अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्याबाबत मार्गदर्शन करत पालकांनी मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे, युवकांनी व्यसनापासून दूर राहून सकारात्मक जीवनशैली स्वीकारावी, असे आवाहन केले.

यावेळी शिरूर शहरातील नागरिक व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 5 3 7 2
Users Today : 2
Users Yesterday : 106