गणेगाव दुमाला येथे मोबाईल नेटवर्क वारंवार गायब; नागरिक हैराण

Facebook
Twitter
WhatsApp

मांडवगण फराटा (प्रतिनिधी): संतोष साळुंके
गणेगाव दुमाला परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोबाईल नेटवर्कची गंभीर समस्या निर्माण झाली असून, दिवसातून कित्येक तास मोबाईल सेवा पूर्णपणे खंडित होत असल्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

नेटवर्क उपलब्ध नसल्यामुळे फोन कॉल लागत नाहीत, इंटरनेट सेवा बंद पडते, तसेच ऑनलाइन व्यवहार, शासकीय कामे, विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण आणि व्यावसायिक व्यवहारांवरही परिणाम होत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका, पोलिस किंवा इतर महत्त्वाच्या सेवांशी संपर्क साधण्यातही अडचणी येत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

वारंवार तक्रारी करूनही संबंधित मोबाईल सेवा कंपन्या आणि प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. पुणे ग्रामीण न्युजशी बोलताना ग्रामस्त निखिल निंबाळकर, दत्ता भोसले,आकाश निंबाळकर, प्रमोद गरुड यांनी गणेगाव दुमाला येथील मोबाईल नेटवर्कची समस्या तातडीने सोडवून नियमित सेवा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी अनेकदा संबंधित अधिकाऱ्यांशी केली आहे असे सांगितले.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 5 2 7 3
Users Today : 9
Users Yesterday : 54