मांडवगण फराटा प्रतिनिधी :संतोष साळुंके
श्रद्धा, भक्ती आणि उत्साहाच्या वातावरणात श्री वाघेश्वर प्रासादिक दिंडी सोहळ्याचे मंगलमय प्रस्थान दि.११/०७/२०२६ रोजी झाले.
टाळ-मृदुंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात आणि शेकडो भाविकांच्या उपस्थितीत दिंडी मार्गस्थ झाली.
प्रस्थानापूर्वी श्रींची विधिवत पूजा, आरती आणि कीर्तनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर दिंडीला मान्यवरांच्या हस्ते शुभेच्छा देण्यात आल्या.

यंदा दिंडीच्या रथासाठी बैलजोडीचा मान गावचे उपसरपंच भाऊसाहेब कोळपे यांच्या बैलजोडीला मिळाला. या मानामुळे कोळपे कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण असून, त्यांनी भक्तिभावाने रथसेवा करण्याचा मान स्वीकारला.

“ज्ञानोबा-तुकाराम” आणि विठ्ठलनामाच्या जयघोषात दिंडी पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाली. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला.





Users Today : 1
Users Yesterday : 187