शिक्रापूर, प्रतिनिधी: विनायक साबळे
लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) लेबर सेल, महाराष्ट्र राज्य व राज्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने पूर्व केंद्रीय मंत्री, पद्मभूषण स्व. रामविलास पासवान यांची ८० वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.

शिक्रापूर येथील आशीर्वाद ट्रस्ट संचलित गुरुकुल वस्तीगृह व अनाथ आश्रम येथे हा कार्यक्रम झाला. सुरुवातीला स्व. पासवान यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यानंतर वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना पौष्टिक नाश्ता देण्यात आला. संस्थेला एका महिन्यासाठी लागणारा किराणा देखील सुपूर्द करण्यात आला. गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

यावेळी प्रदेशाध्यक्ष शरद टेमगिरे, उपाध्यक्ष शाम भाऊ लांडे, उद्योजक शुभम शेवाळे, प्रहार संघटनेचे शिरूर तालुका कार्याध्यक्ष व पत्रकार संदीप डाखुळकर, उद्योजक आबासाहेब गिलबिले, दर्शन टेमगिरे, प्रणव टेमगिरे, तसेच गुरुकुल वस्तीगृहाचे संस्थापक/अध्यक्ष शिवाजी शिंदे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी शरद टेमगिरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. ते म्हणाले की, “स्व. रामविलास पासवान साहेबांनी संपूर्ण राजकीय कारकिर्दीत दलित, गरीब, वंचित, शोषित, कामगार आणि दुर्बल घटकांच्या हक्कांसाठी सातत्याने संघर्ष केला. सामाजिक न्याय आणि समान संधीसाठी त्यांचे योगदान प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपत गरजू घटकांच्या सेवेसाठी असे उपक्रम सतत राबवले जातील. समाजसेवा हीच त्यांना खरी आदरांजली आहे.




Users Today : 0
Users Yesterday : 94