शिरूर प्रतिनिधी:
“पंरपरा तीच विचार थोडा मोठा व्हावा फांदी कशाला तोडताय एखादा वटवृक्ष दत्तक घ्या ना”या वाक्याला पुरक असेच,गेली पाच वर्ष आदिशक्ती महिला मंडळ व आधार छाया फाउंडेशन शिरूर येथील,सिद्धेश्वर ऑक्सिजन पॉईंट, शिरूर फिल्टरेशन प्लांट जवळ वडाची झाडे लाऊन वटपोर्णिमा साजरी करत आहेत.

या वर्षी ही वडाच्या झाडावर फेऱ्या मारून वटपोर्णिमा साजरी न करता ,ऑक्सिजन देणारी झाडे लावत फक्त स्वतः च्या पतीचे प्राण वाचवणे व त्याला दीर्घायुषी मिळावे म्हणून प्रार्थना न करता,समाजातील सर्वांना निरोगी आयुष्य लाभण्यासाठी,शुद्ध हवा व ऑक्सिजन मिळावा यासाठी ,वडाची झाडे लावून आदिशक्ती महिला मंडळ व आधार छाया फाउंडेशन वटपोर्णिमा साजरी केली.

यावेळी ऐश्वर्याताई पाचर्णे नगराध्यक्ष शिरूर नगर परिषद,कोमल वाखारे – मा.जि. प . सदस्य,पुजा पोटावळे ,संगिता मल्लाव,
डॉ. सुनिता पोटे ,स्वप्नीली जामदार ,सुनिता भुजबळ ,
रिंकु जगताप ,शिला कोळपकर ,वर्षाताई काळे ,स्वाती थोरात
श्रुतिका झांबरे,आधार छाया फाउंडेशन च्या सविता बोरुढे,आदिशक्ती महिला मंडळ च्या शशिकला काळे व अनेक महिला उपस्थित होत्या.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून शिरूर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजीत पाचरणे या उपस्थित होत्या होत्या ,यावेळी त्यांनी २५ झाडे लावत कार्यक्रमाची सुरुवात केली व वटपोर्णिमा फक्त नवऱ्याच्या दीर्घायुषी होण्यासाठी प्रार्थना करणे नसून “पर्यावरन दीर्घायुष”होण्यासाठी चा संकल्प आहे. असे त्यांनी सांगितले.

यावेळी शिरूर शहरातील अनेक महिलांबरोबर व आदिशक्ती ग्रुप,आधारछाया ग्रुप,वैभवी ग्रुप ,वात्सल्यसिंधु फाउंडेशनमधील महिला भगिनी उपस्थित होत्या.
यावेळी ५० महिलांना “एक झाड आईच्या नावे “ मोहिमे मार्फत रोपांचे मोफत वाटप करण्यात आले.





Users Today : 4
Users Yesterday : 158