शिरूर प्रतिनिधी:
दि. २३ जून २०२६ रोजी,
शिरूर नगरपरिषदेच्या महिला व बालविकास विभागामार्फत “एकल महिला दिन” कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये शिरूर शहरातील मोठ्या संख्येने एकल महिलांनी उपस्थित राहून शासनाच्या विविध योजना, महिला सक्षमीकरण, स्वयंरोजगार व स्वावलंबनाबाबत मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित एकल महिलांचे हळदी-कुंकू व पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले.

यावेळी नगराध्यक्षा सौ. ऐश्वर्या पाचर्णे, महिला व बालविकास समितीच्या सभापती सौ. आयशा कलम सय्यद, उपसभापती सौ. स्वप्नाली जामदार, मुख्याधिकारी प्रीतम लक्ष्मण पाटील, सुवर्णा खरमाटे संजय गांधी निराधार योजना नायब तहसीलदार शिरूर , साऊ एकल महिला समिती महाराष्ट्रचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी, प्रत्युष कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल बिरादार, राजेश पाटील, चौधरी सर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा मा. सौ. ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे, मुख्याधिकारी प्रितम पाटील, सार्वजनिक बांधकाम समिति सभापती सुनिल जाधव, स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती सभापती एजाज अन्सार बागवान,पाणीपुरवठा, जलनिस्सारण व विद्युत समितीचे सभापती सौ. सुनिता संतोष पोटे, नियोजन व विकास गृहनिर्माण, टपरी व झोपडपट्टी पुनर्वसन समितीचे सभापती सौ. स्वाती चेतन साठे, महिला व बालकल्याण समितीचे सभापती सौ. आयेशा कलिम सय्यद, महिला व बालकल्याण समितीचे उपसभापती सौ. स्वप्नाली योगेश जामदार, सदस्या, श्रीम. संगीता महेन्द्र मल्लाव,सदस्या, सदस्य, सागर त्रिंबक नरवडे, सदस्या, सौ. सुनीता आनंद भुजबळ, सदस्या, सौ. पुजा पुष्कराज पोटावळे, सदस्या, सौ. चारुशीला गणेश कोळपकर, सौ. स्विटी दत्तराव शिंदे सौ. सविता सचिन राजापुरे, उमेश कैलास शेळके, अभिजित गणेश पाचर्णे, अमोल दादासाहेब चव्हाण इत्यादी सदस्य उपस्थित होते.

आलेल्या पाहुण्यांनी एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देत महिलांनी संघटित होऊन आर्थिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम बनण्याचे आवाहन केले.
अध्यक्षीय भाषणात नगराध्यक्षा सौ. ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांनी एकल महिलांच्या सन्मान व सक्षमीकरणासाठी शिरूर नगरपरिषद सदैव कटिबद्ध राहील, अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे घोषवाक्य “एकल महिला सशक्त तर समाज सक्षम” तसेच “स्वाभिमान, समानता आणि सन्मान – प्रत्येक एकल महिलेचा अधिकार” यांचा उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे उच्चार करून कार्यक्रमास उत्साहपूर्ण प्रतिसाद दिला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महिला व बालविकास विभाग, शिरूर नगरपरिषद तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे एकल महिलांच्या प्रश्नांबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी व अधिकारी वर्गामध्ये संवेदनशीलता निर्माण झाली असून, त्यांना शासकीय योजनांचा थेट लाभ मिळण्यास मदत होणार आहे. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित महिलांसाठी अल्पोपहार व चहापानाची व्यवस्था करण्यात आली होती.





Users Today : 10
Users Yesterday : 289