Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल

Facebook
Twitter
WhatsApp

मांडवगण प्रतिनिधी:संतोष साळुंके
प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर यांच्या चौथीच्या पाठ्युस्तकात बचत या कथेची निवड झाल्याबद्दल त्यांचा शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने लेखक व समीक्षक प्राध्यापक कुंडलिक कदम यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.


यावेळी कार्यक्रमाला पुणे येथील पदवीधर आघाडीचे सचिव शंकर भुजबळ, कवी आकाश भोरडे, अमोल चांदणे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार यावर्षी चौथीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आलेला आहे. नवीन छपाई करण्यात आलेल्या पाठ्यपुस्तकात यावर्षी प्रसिद्ध साहित्यिक सचिन बेंडभर यांच्या बचत या कथेचा समावेश करण्यात आला आहे. या गोष्टीची दखल घेत शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने लेखक व समीक्षक प्राध्यापक कुंडलिक कदम यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुणे येथील पदवीधर आघाडीचे सचिव शंकर भुजबळ, स्वागत आकाश भोरडे तर आभार सचिन बेंडभर यांनी केले.

[आपल्या माणसांच्या हस्ते व आपल्या भूमीच झालेला सन्मान हा विशेष आनंददायी असतो. या सन्मानाने साहित्य लेखनास निश्चितच नवी ऊर्जा मिळाली. साहित्य क्षेत्रात वीस वर्षे काम करत असताना आज खऱ्या अर्थाने या कामाचे चीज झाल्यासारखे वाटते. शिरूर मधील साहित्यिकांनी माझा जो सन्मान केला त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद.]

Screenshot

सचिन बेंडभर
महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त साहित्यिक शिक्षक.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 5 0
Users Today : 2
Users Yesterday : 48