शिरूर प्रतिनिधी:
काही महिन्यांपूर्वी शिरूर नगरपालिका निवडणूक झाल्यानंतर, शिरूर शहरातील काही प्रभाग मधील नगरसेवक व नगरसेविका आपापल्या वार्ड मध्ये जोमाने व लक्ष पुर्वक काम करत असल्याचे दिसून येत आहे.
शिरूर शहरातील अनेक शाळा, हॉस्पीटल व जास्त रहदारी असणारा प्रभाग म्हणुन ओळख असणारा “गुजरमळा”.

सी. टी बोरा कॉलेज, थिटे कॉलेज व अनेक शाळा , कॉलेज ला व बाबुराव नगर येथील नागरिक यांना शिरूर मध्ये येण्यासाठी निर्माण प्लाझा रोड वरून यावे लागते.
मागील आठ दिवसांपासून सकाळी नगर पालिकेचे पिण्याचे पाणी सोडले जाते, तेव्हा ते पाणी सी. टी बोरा कॉलेज रोड व मगर हॉस्पिटल रोड ने खूप मोठया प्रमाणात वाहताना दिसते. त्या पाण्याच्या दुर्गंधी मुळे सकाळी जाणाऱ्या येणाऱ्या नागरिक व तिथे वास्तव्य करणाऱ्या लोकांना ही त्रास होत आहे, पण नगरसेवक म्हणुन निवडून येणाऱ्या नगरसेवक मोहदयना याची काही कल्पना दिसत नाही?
नगर पालिका निवडणुक झाल्यानंतर त्यांना प्रभागात फिरणे किंव्हा प्रभागातील नागरिकांच्या समस्या जाणून घेणे आवश्यक वाटत नसले तरी डोळ्याने दिसतात त्या समस्या सोडाव्यात अशी गुजरमळा प्रभाग चर्चा सुरू आहे.
गुजरमळा प्रभागामध्ये अनेक समस्या आहेत, पण सोडविणार कोण?

काही दिवसांपूर्वी ड्रेनेज चे झाकण तुटल्या मुळे अपघात होऊ शकतो. अशी बातमी “पुणे ग्रामीण न्यूज” ने प्रकाशित केली होती म्हणुन नगर परिषद अधिकारी यांनी तत्काळ ते झाकण बदले.






Users Today : 4
Users Yesterday : 614