अधिक मासानिमित्त महिलांना अक्कलकोट स्वामी समर्थ दर्शन; नगरसेविका डॉ. सुनिताताई पोटे यांचा स्तुत्य उपक्रम

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर, प्रतिनिधी सुदर्शन दरेकर
अधिक मास, गुरुवार आणि एकादशी असा दुर्मीळ त्रिवेणी योग जुळून आल्याच्या पवित्र निमित्ताने शिरूर शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील महिलांसाठी अक्कलकोट येथे स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाचा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आला. या धार्मिक सहलीमुळे महिलांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंदाचे भाव पाहायला मिळाले.


हा उपक्रम नगरसेविका डॉ. सौ. सुनिताताई पोटे यांच्या पुढाकारातून राही प्रतिष्ठान आणि आत्मनिर्भर सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. अक्कलकोट येथे जाऊन स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेण्याची संधी मिळाल्याने सहभागी महिलांनी समाधान व्यक्त केले.

Screenshot

अधिक मासाचे धार्मिक महत्त्व, त्यात गुरुवार आणि एकादशीचा शुभयोग यामुळे या दर्शन यात्रेला विशेष आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले. दर्शनानंतर महिलांनी स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करून कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी आशीर्वाद घेतले.


या उपक्रमाबद्दल महिलांनी नगरसेविका डॉ. सुनिताताई पोटे, राही प्रतिष्ठान आणि आत्मनिर्भर सोशल फाउंडेशन यांचे आभार मानले. समाजातील महिलांना धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांद्वारे एकत्र आणण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याची भावना यावेळी अनेक महिलांनी व्यक्त केल्या.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 7 9 0 3 9
Users Today : 5
Users Yesterday : 134