शिरूर प्रतिनिधी : सुदर्शन दरेकर रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन आणि दहशतवाद विरोधी शाखा (पुणे ग्रामीण) यांच्या संयुक्त पथकाने कारेगाव परिसरातील एका लॉजिंगवर छापा टाकून सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवाईत सात महिलांची सुटका करण्यात आली असून दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार नगर-पुणे महामार्गालगत कारेगाव येथील एका लॉजिंगमध्ये ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी लुतफ्फर मुज्जमलहक शेख (वय 45) याला अटक करण्यात आली असून बबलू साहू हा फरार आहे. दोघांविरुद्ध स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

छापा कारवाईदरम्यान सात महिलांची सुटका करण्यात आली. त्यापैकी तीन महिला बांग्लादेशी नागरिक असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. सर्व पीडित महिलांना संरक्षणासाठी महिला सुधारगृह, मुंढवा (पुणे) येथे ठेवण्यात आले असून बांग्लादेशी महिलांबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ही कारवाई पुणे ग्रामीण पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात करीत आहेत.





Users Today : 315
Users Yesterday : 240