Breaking News
रांजणगाव वेश्याव्यवसायावर छापा; सात महिलांची सुटका, पुणे नगर रोडवर अनेक बेकायदेशीर उद्योग होत असल्याचे स्पष्ट मराठा आरक्षण आंदोलनातील मृत आंदोलकांच्या वारसांना MIDC मध्ये अनुकंपा नोकरीचा मार्ग मोकळा जिल्हाधिकाऱ्यांना वारसांची पडताळणी करून प्रमाणपत्र देण्याचे निर्देश करडे घाटात थरारक गोळीबार; एका युवकाची हत्या… दुसरा गंभीर जखमी शिरूर तालुक्यात खळबळ; गोळीबाराने परिसर दणाणला जामखेड तालुक्यातील श्री क्षेत्र चौंडीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा ३०१ वी जयंती महोत्सव. कर्तव्य, शिस्त आणि समर्पणाचा आदर्श; शिरूर आगारातील सहा कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न अखेर जरांगेंचे उपोषण स्थगित; सरकारच्या आश्वासनांवर मराठा समाजाच्या नजरा! राधाकृष्ण विखे पाटील व प्रसाद लाड यांच्या मध्यस्थीला यश मागण्या पूर्ण होणार का? मराठा समाजात उत्सुकता आणि सावध प्रतीक्षा

मराठा आरक्षण आंदोलनातील मृत आंदोलकांच्या वारसांना MIDC मध्ये अनुकंपा नोकरीचा मार्ग मोकळा जिल्हाधिकाऱ्यांना वारसांची पडताळणी करून प्रमाणपत्र देण्याचे निर्देश

Facebook
Twitter
WhatsApp

पुणे प्रतिनिधी :सुदर्शन दरेकर
मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांना दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) धर्तीवर आता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) मध्येही अशा मृत आंदोलकांच्या कुटुंबातील एका अवलंबितास अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Screenshot

यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शासनाकडून आदेश जारी करण्यात आले आहेत. जलसंपदा (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री यांच्या २७ मे २०२६ च्या पत्राचा तसेच २४ मार्च २०२६ रोजी झालेल्या ४१० व्या संचालक मंडळ बैठकीतील निर्णयाचा संदर्भ या आदेशात देण्यात आला आहे.


वारसांची शहानिशा करून प्रमाणपत्र देणार:

 

शासन आदेशानुसार, मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबातील पात्र वारसांची योग्य पडताळणी करून संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेले प्रमाणपत्र देणे आवश्यक राहणार आहे. हे प्रमाणपत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ कडून अनुकंपा तत्त्वावरील नियुक्तीसाठी ग्राह्य धरले जाणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश
राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील अशा प्रकरणांची अचूक, पारदर्शक आणि गतीमान पद्धतीने तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तपासणी पूर्ण झाल्यानंतर पात्र वारसांना अधिकृत प्रमाणपत्र तातडीने निर्गमित करून देण्याची कार्यवाही करण्यास सांगण्यात आले आहे.

 

आंदोलनग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा:

मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान विविध ठिकाणी झालेल्या घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या आंदोलकांच्या कुटुंबीयांसाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या निर्णयामुळे संबंधित कुटुंबातील एका अवलंबित सदस्याला रोजगाराची संधी उपलब्ध होणार असून त्यांच्या आर्थिक स्थैर्यास मदत होणार आहे.


राज्य शासनाच्या या निर्णयामुळे आंदोलनग्रस्त कुटुंबांना न्याय देण्याच्या प्रक्रियेला गती मिळणार असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 7 8 3 4 7
Users Today : 315
Users Yesterday : 240