शिरूर, प्रतिनिधी :सुदर्शन दरेकर
शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर सोमवारी सायंकाळी सुमारे ५ ते ५.३० वाजण्याच्या दरम्यान झालेल्या थरारक गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण तालुका हादरला आहे. भरधाव वाहनाला धडक देऊन अडवण्यात आल्यानंतर झालेल्या गोळीबारात एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली, तर दुसरा युवक गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, विशाल काळे (वय ३१, रा. बाबुराव नगर, शिरूर) याचा घटनास्थळी मृत्यू झाला असून केदार झाडगे (रा. कुंभार आळी, शिरूर) हा गंभीर जखमी झाला आहे. जखमी युवकावर उपचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, करडे घाट परिसरात अचानक गोळीबाराचे आवाज घुमल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिसराची नाकाबंदी करण्यात आली आहे.
गोळीबाराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून विविध अंगांनी तपास सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
या धक्कादायक घटनेमुळे शिरूर शहरासह संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शिरूर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

प्राथमिक प्राथमिक:

माहितीनुसार असून पोलीस तपासानंतर अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे.







Users Today : 144
Users Yesterday : 26