पुणे प्रतिनिधी:सागर पवार
बारामती येथे भाग्यलक्ष्मी सोशल फाउंडेशन व पंचक्रोशी प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाठ्यपुस्तकातील साहित्यिकांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. यात प्रसिद्ध लेखक सचिन बेंडभर यांचा सन्मान निवृत्त शिक्षण संचालक व कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी तांबे यांच्या हस्ते अभिषेक पॅलेस बारामती येथे करण्यात आला.

भाग्यलक्ष्मी सोशल फाउंडेशन व पंचक्रोशी प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पाठ्यपुस्तकातील साहित्यिक व अन्य प्रतिभावंतांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला. यात पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध लेखक सचिन शिवाजीराव बेंडभर यांचा सन्मान निवृत्त शिक्षण संचालक व कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजी तांबे यांच्या हस्ते अभिषेक पॅलेस बारामती येथे करण्यात आला. यावेळी निमंत्रित कवींचे कविसंमेलन घेण्यात आले. सोमनाथ सुतार, अलका रसाळ, मिना म्हसे आदी कवींनी आपल्या कविता सादर केल्या.

यावेळी संभाजी नाना होळकर, ज्येष्ठ लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले, मोगल जाधव, संतोष पवार, बबन पोतदार, अजित काटकर, निलेश गवळी, संजय जाधव, माधव जोशी वनिता जाधव, किरण आळंदीकर, मेनकाताई मगर, आशादेवी वायाळ, सचिन ठोंबरे आणि सागर वायाळ आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
साहित्यिक सन्मान स्विकारताना लेखक सचिन बेंडभर:
[भाग्यलक्ष्मी सोशल फाउंडेशन व पंचक्रोशी प्रकाशन यांचे सामाजिक व साहित्यिक क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे. पाठ्यपुस्तकातील साहित्यिक व प्रतिभावंतांचा सन्मान केल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो व भविष्यात अशाच प्रकारच्या प्रेरणादाक कामाची अपेक्षा व्यक्त करतो.]





Users Today : 6
Users Yesterday : 469