नमामि गंगे महिला प्रभाग संघ ची वार्षिक सर्व साधारण सभा उत्साहात.

Facebook
Twitter
WhatsApp

मांडवगण प्रतिनिधी – संतोष साळुंके.
काल शिरूर तालुक्यातील वडगाव रासाई मांडवगण फराटा या जिल्हा परिषद गटातील *नमामि गंगे महिला प्रभागसंघ* ची वार्षिक सर्वसाधारण सभा मा. पंचायत समिती सदस्य सौ.संगीताताई फराटे पंचायत समिती सदस्य मा.श्री.विकास शेलार ,ग्रा.पं सदस्य सागर नाना फराटे, सादलगावचे सरपंच खंडेराव मिठे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

Screenshot

या वार्षिक सर्वसाधारण सभेत कार्यक्रमाच्या प्रास्तविकामध्ये उमेद अभियानाच्या कामकाजाची माहिती आणि वार्षिक सर्वसाधारण सभेचा उद्देश स्पष्ट करण्यात आला.प्रभागसंघाचे वार्षिक अहवाल वाचन प्रभागसंघ व्यवस्थापक यांनी केले. दरम्यान संगिनी सॅनिटरी नॅपकिन महिला उत्पादक गट, जीवनज्योती महिला स्वयं सहायता समूह संचलित – कृषी औजार बँक, आदर्श ग्रामसंघ, आदर्श ग्रामसखी, आणि प्रभागातील नवीन व्यवसाय सुरू केलेल्या 10 नव उद्योजिका यांचा सन्मान उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.


या वार्षिक सर्वसाधारण सभेत श्री.दादासाहेब शिंदे तालुका व्यवस्थापक (SIIBCB) गाव समावेशन PIP प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले…., तसेच पशु संवर्धन विभागाचे पशु वैद्यकीय अधिकारी श्री. विष्णू ठोंबरे यांनी पशु संवर्धन विभागाच्या योजनाबाबत माहिती दिली.

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या तथा सेंद्रीय शेतीच्या पुरस्कर्त्या श्रीम.वसुधा सरदार यांनी महिलाना महिला सक्षमीकरण या विषयी मोलाचे मार्गदर्शन केले. ICICI बँक व्यवस्थापक श्रीम.आरती मॅडम यांनी ICICI बँकेकडून स्वयं सहायता समूहाना होणाऱ्या बँक अर्थ सहाय्यबाबत माहिती दिली तसेच नियमित कर्ज परतफेडीबद्दल महिलांचे अभिनंदन केले.यावेळी ICICI बँकेचे राठोड  सर देखील उपस्थित होते, या कार्यक्रमामध्ये ICICI बँकेकडून मागील आर्थिक वर्षात जास्तीत जास्त बँक कर्ज प्रस्ताव सादर करणाऱ्या ग्रामसखीचा आणि प्रभागसंघाच्या पदाधिकारी यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

दरम्यान तालुका अभियान व्यवस्थापक अजिंक्य थिटे सर यांनी प्रभागसंघाच्या कामकाजाबाबत प्रभागसंघाचे कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

ग्रामसखी ताईचे मनोगत आणि प्रभागसंघाच्या अध्यक्ष यांच्या आभार प्रदर्शनाने वार्षिक सर्वसाधारण सभेची सांगता झाली.

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 7 5 9 6 4
Users Today : 1
Users Yesterday : 71