एक यशस्वी उद्योजक “अशोक धर्मराज ढाकणे “

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:
पुणे जिल्ह्यातील,शिरुर शहरात शुन्यातून विश्व निर्माण करत एक यशस्वी उद्योजक म्हणून,आपली ओळख निर्माण करणारे, बीड जिल्हा ता.केज येथील सारुळ या छोट्याशा गावातील, एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती, दोनशे पन्नास रुपयापासून सुरू केलेल्या संघर्षमय प्रवासाची आज २५ कोटींची वार्षिक उलाढाल करत “प्रथमेश मसाले” या नावाने उदयोजक विश्वात आपली वेगळी निर्माण करणारे अशोक धर्मराज ढाकणे ” यांना News 18 मराठीच्या “Starup Maharashtra
Award” ने नुकतेच गौरविण्यात आले.

“हा राज्यस्तरीय सन्मान सोहळा मुंबई येथे पार पड़ला. यावेळी महाराष्ट्राचे उदयोग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते अशोक ढाकणे यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

 

अशोक ढाकणे यांनी आपल्या उद्योगाची सुरुवात पुणे जिल्ह्यातील शिरूर येथून केली होती. सुरवातीला लहानशा स्वरूपात रोवलेल्या रोपट्याचे काही काळातच वटरुक्ष झालेला सर्वांना दिसत आहे. “प्रथमेश स्पायसी “ने काही काळातच २५ कोटींची वार्षिक उलाढाल गाठली आहे. चार ते पाच वर्षाच्या कालावधीत या व्यवसायाने मोठी उंची गाठत अनेक लोकांना काम दिले आहे व अनेक संसाराना आर्थिक हातभार लावला आहे.

Screenshot

पुणे ग्रामीण न्युज शी बोलताना अशोक ढाकणे यांनी सांगितले की ,माझा प्रवास अंत्यत खडतर होता. परंतु मेहनत व प्रमाणीकपणा काहीही वाया जात नाही .मला मिळालेला सन्मान माझ्या संघषाची आणी कामाची पावती आहे.” प्रथमेश स्पायसेस “च्या माध्यमातून अधिकाधिक युवकांना उद्योग व्यवसायात पुढे आणण्याचे कार्य पुढेही सुरू राहील.”

punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 7 5 7 7 9
Users Today : 29
Users Yesterday : 175