शिरूर प्रतिनिधी -सुदर्शन दरेकर
सोनेसांगवी येथील सराईत गुन्हेगार सुरज राजेश पाडळे (वय 26) यास महाराष्ट्र प्रतिबंधक कायदा (MPDA) अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार संघटित गुन्हेगारी, दरोडे, खंडणी, हत्यार बाळगणे, दहशत निर्माण करणे आदी गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आरोपींवर कठोर कारवाई सुरू आहे.
रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीतील आरोपी सुरज पाडळे याच्यावर दरोडा, खंडणी, घातक हत्यारांचा वापर, अग्निशस्त्र बाळगणे तसेच प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करून दहशत निर्माण केल्याप्रकरणी अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी आरोपीविरोधात एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव सादर केला होता. त्यानंतर पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी दिनांक 12 मे 2026 रोजी आरोपीस स्थानबद्ध करण्याचे आदेश जारी केले.

पोलीस पथकाने आरोपीला ताब्यात घेऊन नागपूर मध्यवर्ती कारागृहात दाखल केले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.






Users Today : 37
Users Yesterday : 261