शिरूर प्रतिनिधी-सुदर्शन दरेकर
सोन्याची मोड देण्याच्या बहाण्याने तब्बल 1 कोटी रुपयांच्या व्यवहारात 84 लाख 65 हजार रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत ओमकार अशोक अष्टेकर (रा. कोथरूड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 जानेवारी 2026 रोजी शिरूर येथील व्हेन हुसेन शोरूमसमोर आरोपी प्रशांत बर्मेचा (रा. शांतीनगर, पुणे) याने सोन्याची मोड देतो असे सांगून विश्वास संपादन केला. त्यानंतर कविता पराळे व मधु पराळे यांच्या मार्फत 1 कोटी रुपयांची रोख रक्कम घेण्यात आली.

यातील 15 लाख 35 हजार रुपये परत देण्यात आले, मात्र उर्वरित 84 लाख 65 हजार रुपये तसेच सोने न देता आरोपीने रकमेचा अपहार करून फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 432/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 316(2), 318(4) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक केंजळे करीत आहेत.





Users Today : 37
Users Yesterday : 261