शिरूर | प्रतिनिधी-सुदर्शन दरेकर
शिरूर शहरातील वार्ड क्रमांक २ मध्ये गरीब व कष्टकरी महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा प्रेशर कुकर वाटपाचा उपक्रम नुकताच उत्साहात पार पडला. राही फाउंडेशन, आत्मनिर्भय फाउंडेशन आणि नगरसेविका सौ. स्वप्नालीताई जामदार यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या उपक्रमामुळे अनेक गरजू महिलांना घरगुती कामात उपयोगी पडणारी वस्तू मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्ट दिसून आला.

कार्यक्रमावेळी राही फाउंडेशनच्या अध्यक्षा व पाणीपुरवठा सभापती डॉ. सुनिताताई पोटे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की,

“महिलांनी स्वयंपूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करावी. त्यासाठी आम्ही प्रौढ महिला वर्ग सुरू केला आहे. या माध्यमातून महिलांना अक्षर ओळख करून देण्याचा प्रयत्न होत आहे. आज प्रेशर कुकर वाटप करताना मनापासून आनंद होत आहे. भविष्यातही तळागाळातील महिलांसाठी विविध उपक्रम राबवणार आहोत.”
यावेळी आत्मनिर्भय फाउंडेशनच्या चिपाडे ताई यांनी महिलांना विविध शासकीय योजनांची माहिती दिली. विशेषतः एकल महिला, मुली आणि विद्यार्थ्यांसाठी असलेल्या योजनांवर त्यांनी प्रकाश टाकला. पुढील काळात अधिकाधिक महिलांना योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नगरसेविका स्वप्नाली जामदार यांनी आपल्या भाषणात नागरिकांप्रती बांधिलकी व्यक्त करताना सांगितले,
“रस्ते, पाणी, आरोग्य, गटार यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर आमचे लक्ष आहेच. मात्र नागरिकांशी असलेली नाळ जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येक नागरिकापर्यंत योजना पोहोचवण्यासाठी आम्ही सातत्याने काम करत राहू.”
कार्यक्रमाच्या शेवटी प्रेशर कुकर घेऊन आनंदाने घरी परतणाऱ्या महिलांचे समाधान पाहून उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. या सामाजिक उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. संतोष पोटे, उद्योजक गणेश कोळपकर आणि कुंभार समाजाचे अध्यक्ष योगेश जामदार उपस्थित होते.





Users Today : 10
Users Yesterday : 119