Breaking News
शिरूर मधील साहित्यिकांच्या वतीने सचिन बेंडभर यांचा सन्मान पाठ्यपुस्तकातील बचत या कथेची विशेष दखल मनपा भवनावर खासगीकरणाच्या दुकानाचा फलक लावा – चेतन पवार कडक उन्हात शिवसेनेचा जागर मोर्चा शेषात्मज गणेश जयंतीनिमित्त ‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावट श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट : विदुषी शैला दातार यांची स्वराभिषेकातून गायनसेवा बेंडभर पाटलांच्या कवितेला मिळाला शाळेच्या भिंतीवर झळकण्याचा मान चांदोमामा ही कविता पंढरपूर येथील शाळेच्या भिंतीवर कॅप्टन प्रवीण रखमा कोळपे यांच्या नेमबाजीतील यशाबद्दल निर्वी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला. जगतापवाडी शाळेत नवागतांचे उत्साहात स्वागत व कौतुक

भोलाई माता मंदिर परिसरात जुगार अड्ड्यावर पोलिसांची कारवाई: सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Facebook
Twitter
WhatsApp

शिरूर प्रतिनिधी:सुदर्शन दरेकर

शिरूर तालुक्यातील आण्णापूर येथील भोलाई माता मंदिराच्या पाठीमागील परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर शिरूर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 4 मे 2026 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास आरोपी 52 पत्त्यांच्या केंटवर रम्मी नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकली असता आरोपींनी पोलिसांची चाहूल लागताच तेथून पळ काढला.


घटनास्थळावरून दोन पत्त्यांचे केंट, रोख रक्कम तसेच एक मोबाईल फोन असा एकूण सुमारे 36 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी अझर शाबुद्दीन पठाण, लारा गव्हाणे, केशव मोहन चौघुले, राजू मारुती पवार, विठ्ठल बबन पवार आणि दिलीप भाऊ कुरंदळे (सर्व रा. आण्णापूर, ता. शिरूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास शिरूर पोलीस करत आहेत.

Screenshot
punegraminnews
Author: punegraminnews

Leave a Comment

Share Market

Also Read This

Gold & Silver Price

Our Visitor

0 8 0 0 7 7
Users Today : 6
Users Yesterday : 23