शिरूर प्रतिनिधी:
दरवर्षी या वर्षी ही शिरूर नगर पालिकेत महाराष्ट्र दिना निमित्त,नगराध्यक्ष ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी शाळा क्र. ५ मधील शिक्षक व विद्यार्थीनी यांनी वंदे मातरम व राष्ट्रगीत गात सर्व उपस्थीत मान्यवरांनी सलामी दिली.

यावेळी नगराध्यक्ष ऐश्वर्या पाचर्णे व शिरूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रितम पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करत ,सर्व कामगार वर्ग व आपल्या सहकाऱ्यांना कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपस्थीत सर्व नगरपालिका कर्मचारी , अधिकारी,पत्रकार,सर्व नगरसेवक व सर्व नगरसेविका यांचा ,ऐश्वर्या पाचर्णे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

तसेच नगर परिषदेच्या सभापती पाणी पुरवठा,विद्युत पुरवठा , नगरसेविका डॉ.सुनीता पोटे यांनी महिलांसाठी केलेल्या उलेखनीय कामांमुळे विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी नगरपालिका येथे ठेवण्यात आलेल्या सेल्फी पॉइंट मध्ये सर्वांनी सेल्फी ही घेतले.






Users Today : 96
Users Yesterday : 29